What happened to the fact that the grandfather killed his grandson by strangling him?

राजुरवाडी येथे एका १७ वर्षीय युवकाचा मृतदेह शाळेच्या तारेच्या कंपाऊंड जवळ आढळून आला. सदर तरुणाचा गळा आवळून खून केल्याचे मंगळवार २४ मे रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी आजोबा गणपतराव उपासराव कंठाळे व अन्य दोन महिलांविरुद्ध कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

    मोर्शी : आजोबासह महिलांनी गळा आवळून नातवाला संपविल्याची घटना तालुक्यातील राजूरवाडी येथे उघडकीस आली. एका १७ वर्षीय युवकाचा मृतदेह भारतीय विद्यालयाच्या कंपाऊंडजवळ मंगळवारी (२४ मे) सकाळी आढळून आला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. राजूरवाडी येथील मयूर राजेश लोहे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आजोबा गणपतराव उपासराव कंठाळे व अन्य दोन महिलांविरुद्ध कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. मयूर हा आजी आजोबाला त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे.

     शाळेजवळ आढळला मृतदेह

    राजुरवाडी येथे एका १७ वर्षीय युवकाचा मृतदेह शाळेच्या तारेच्या कंपाऊंड जवळ आढळून आला होता. सदर तरुणाचा गळा आवळून खून केल्याचे मंगळवार २४ मे रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आले. शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजुरवाडी येथील मयूर राजेश लोहे हा १७ वर्षीय युवक आजी आजोबा सोबत राहत होता. तरुणाचे वडील नागपूर येथे राहतात. मात्र, हा युवक वृद्ध आजी-आजोबाकडे राहात आहे. पोलीस पाटील अतुल बोंडे यांनी या प्रकरणी शिरखेड पोलिसात फिर्याद नोंदविली. घटनेची माहिती मोर्शीचे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांना देण्यात आली. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, शिरखेडचे ठाणेदार हेमंत कडुकार व त्यांच्या अधिनस्त पोलीस चमू घटनास्थळी दाखल होऊन मृतकाच्या पंचनामा केला असता या तरुण मुलाचा गळा आवळून हत्या झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.

    आजोबासह दोन महिला ताब्यात

    शिरखेड पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पाठविला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी (२३ मे) च्या मध्यरात्री दरम्यान घडली असून त्याचे प्रेत शाळेच्या कंपाऊंड जवळ टाकून देण्यात आले. त्यामुळे सदर मुलाचा खून करून त्याला शाळेच्या कंपाऊंड जवळ टाकण्यात आल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. घटनास्थळी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते.

    या हत्येचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे, शिरखेडचे ठाणेदार हेमंत कडुकार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज टप्पे, निलेश देशमुख, रामेश्वर इंगोले, प्रभाकर चव्हाण, समीर मानकर, विजय टेकोडे, रमेश नेवारे यांच्याकडून सुरू आहे. या प्रकरणी शिरखेड पोलिसांनी तपासचक्रे फिरवून मयूर याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आजोबा गणपत उपासराव कंठाळे व अन्य दोन महिलांविरुद्ध कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. मयूर हा आजी आजोबाला त्रास देत होता. त्यावरून त्याला संपवून टाकून प्रेत शाळेच्या कंपाऊंड जवळ टाकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.