भाजपात चाललंय काय? जे पी नड्डांच्या कार्यक्रमाला फडणवीस, मुंडे भगिनींची अनुपस्थिती, फडणवीसांना ताप तर मुंडे भगिनींना निमंत्रणच नाही

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपातील अंतर्गत धूसफूस तसेच नाराजीनाट्य समोर आले आहे. या नियोजित कार्यक्रम होता, त्यामुळं महाराष्ट्रातील भाजपाचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित असणार हे क्रमप्राप्त होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्रीपासून ताप आला आहे.

    औरंगाबाद- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या धरतीवर भाजपाने आतापासूनच रणनिती व नियोजन आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, याचाच एक भाग म्हणून भाजपाने दुसऱ्या टप्पातील मिशनला आजपासून सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या “मिशन १४४’ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चंद्रपुरातून होणार आहे. येथील सिव्हिल लाइनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत राहणार होते, मात्र काही नेत्यांची अनुपस्थिती असल्यामुळं तसेच मुंडे भगिनींना निमंत्रणच नसल्यानं भाजपाच्या अंतर्गत गोटात नेमक काय चालले आहे? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

    दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपातील अंतर्गत धूसफूस तसेच नाराजीनाट्य समोर आले आहे. या नियोजित कार्यक्रम होता, त्यामुळं महाराष्ट्रातील भाजपाचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित असणार हे क्रमप्राप्त होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्रीपासून ताप आला आहे. १०३ पर्यंत ताप असल्यानं ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

    तर दुसरीकडे मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोललं जात आहे. खासकरुन पंकजा मुंडे यांची विधान परिषद आमदारकीसाठी वर्णी लागण्याची शक्यता होती, मात्र शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठींनी आणि राज्यातील “मोजक्या” नेत्यांनी त्यांचे तिकीट कापले, तेव्हापासून पंकजा मुंडे ह्या पक्षापासून दुरावला गेल्या असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपातील अनेक कार्यक्रमात दिसल्याच नाहीत. तसेच त्यांनी भगवान गडावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर आजच्या मराठवाड्यातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे निमंत्रण पत्रिकेवर नावच नाही, त्यामुळं पक्षाने देखील पंकजा मुंडेंच्या वकत्यव्याची गंभीर दखल घेतली असं बोललं जात आहे. मात्र या कार्यक्रमात मुंडे भगिनाना निमंत्रण नसल्यामुळं मुंडे समर्थक नाराज झाले असून, चर्चांना उधाण आलं आहे.