काँग्रेसमध्ये चाललंय काय? सत्यजीत तांबेंपाठोपाठ विश्वजीत कदमही भाजपाच्या गळाला लागणार? चर्चांना उधाण, नेमकं काय आहे प्रकरण…

लेटरबॉम्ब आमदार आशिष देशमुखांनी टाकून, थेट पक्षाध्यक्षांकडे तक्रार केली. यावर काँग्रसमध्ये काहीही आलबेल नाही हे स्पष्ट झाले. तर दुसरीकेडे सत्यजीत तांबेंना (Satyajeet Tambe) भाजपाने गळाला लावल्यानंतर आता विश्वजीत कदमही (Vishwajeet Kadam) भाजपाची वाट धरणार का? यावर राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत आहेत.

    मुंबई– काँग्रेस (Congres) पक्षातील अंतर्गत गटबाजी तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांची वाढती संख्या यामुळं सध्या या पक्षाला घरघर लागली असून, अभूतपूर्व गळती लागली आहे. दरम्यान, विधानपरिषद पदवीधर व शिक्षक यांच्या निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेसमधील गटातटाच राजकारण अंतर्गत कलह, आणि नाराजीनाटय हे सर्वांनी पाहिले. नाशिकमधील घोळ किंवा तिथल्या परिस्थितीचा अंदाज प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना नव्हता, असा लेटरबॉम्ब आमदार आशिष देशमुखांनी टाकून, थेट पक्षाध्यक्षांकडे तक्रार केली. यावर काँग्रसमध्ये काहीही आलबेल नाही हे स्पष्ट झाले. तर दुसरीकेडे सत्यजीत तांबेंना (Satyajeet Tambe) भाजपाने गळाला लावल्यानंतर आता विश्वजीत कदमही (Vishwajeet Kadam) भाजपाची वाट धरणार का? यावर राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत आहेत.

    आधीच कुणकुण होती…

    दरम्यान, नाशिक मतदारसंघातून काँग्रसेन सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी अर्ज दाखल न करता, त्यांचा मुलगा सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल केला. आणि काँग्रेसमध्ये हाहाकार माजला. पक्षाला कोणतीच माहीती न देता त्यांना अर्ज दाखल केल्यानं त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली. मात्र त्याआधीच तांबे हे फडणवीस यांच्या संपर्कात होते, त्यामुळं ते भाजपात जाणार ही कुणकुण होती, असं अजित पवारांनी म्हटलेय. दरम्यान, आता सत्यजीत तांबेंना भाजपाने गळाला लावल्यानंतर आता विश्वजीत कदमही भाजपाची वाट धरणार का? यावर राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत आहेत.

    कदम भाजपाच्या वाटेवर?

    माजी मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम हे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचं उदघाटनवेळी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वजीत कदम यांनी आमंत्रित केले होते. त्यावेळी फडणवीस यांना विश्वजीत कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताच, विश्वजीत कदम हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या गोष्टीमुळे मागील अनेक महिन्यांपासून विश्वजीत कदम हे भाजपात प्रवेश करणार या चर्चेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरुवात झाली आहे. तसेच कदम हे फडणवीसांच्या संपर्कात असल्याचं तसेच काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातंय, त्यामुळं तांबेंनंतर आता विश्वजीत कदम देखील काँग्रेसला रामराम करुन भाजपात जाणार का? यावर चर्चा रंगत आहेत.