अकोला चाललंय काय? इंटरनेट बंद, विद्यापीठाच्या परीक्षा रद्द, नेमका वाद घडला तरी कशावरुन?

अकोल्यात शनिवारी इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेल्या पोस्टवरुन दोन गटांत हिंसा झाली. त्यानंतर जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी गाड्यांचीही तोडफोड केली. हिंसेत एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय. तर २ पोलीसांसह ८ जणं जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

    अकोला– अकोल्यात सोशल मीडिय़ावर टाकण्यात आलेल्या एका वादग्रस्त पोस्टवरुन शनिवारी दंगल पेटली. (Shevgaon Riot) या प्रकरणानंतर अद्यापही शेवगावात तणाव आहे. या प्रकरणात पोलिासांनी (police) आत्तापर्यंत 45 जणांना अटक केल्याचं सांगण्यात येतंय. शहरात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी इंटरनेट (Intrenet) बंद करण्यात आलंय. अकोल्यात होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्यात.

    शनिवारी काय घडलं?

    अकोल्यात शनिवारी इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेल्या पोस्टवरुन दोन गटांत हिंसा झाली. त्यानंतर जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी गाड्यांचीही तोडफोड केली. हिंसेत एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय. तर २ पोलीसांसह ८ जणं जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टवरुन संताप व्यक्त करण्यात आला होता. या धार्मिक पोस्टचा विरोध करण्यासाठी अनेक जणं पोलीस ठाण्यात पोहचले होते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हाही दाखल केला होता. त्याच काळात हा जमाव आक्रमक झाला. त्यांनी गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केल्याचं सांगण्यात येतंय.

    हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू

    या हिंसाचारात विलास गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. 40 वर्षांचे विलास हे इलेक्ट्रिशियन होते. दोन गट समोरासमोर आल्यानंतर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या तसचं हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे.