भाजपमध्ये चांलय तरी काय ? पंकजा मुंडेही अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल, अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल होण्याआधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्यासोबत आमदार अभिमन्यू पवार, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, सुजय विखे पाटील हे अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाले. साखर क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक मानली जात होती.

    मुंबई – दिल्लीत भाजपच्या गोटात प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीतील बैठकीसाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे.

    भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील आज दिल्लीत
    मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा मोठा असला तरी भाजपकडून सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या बैठकीसाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी बोलावल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वगळता भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील आज दिल्लीत अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल होण्याआधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्यासोबत आमदार अभिमन्यू पवार, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, सुजय विखे पाटील हे अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाले. साखर क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक मानली जात होती. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक ठिकाणी सहकार क्षेत्राची सूत्रे आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही रणनीती आखली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.