Threats to Hindu leaders

  Threats to Hindu leaders : रझा पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेले सीमकार्ड असलेला सेलफोन वापरत होता आणि तो पाकिस्तान, नेपाळ आणि लाओसमधील लोकांच्या संपर्कात होता. आरोपीच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे.

  रझा पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेले सीमकार्ड
  आरोपीच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, रझा पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेले सीमकार्ड असलेला सेलफोन वापरत होता आणि तो पाकिस्तान, नेपाळ आणि लाओसमधील लोकांच्या संपर्कात होता. निष्पाप तरुणांचे ब्रेनवॉश करण्यात आणि त्यांना भरती करण्याचा प्रयत्न तो करीत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

  भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा परिचल कसा

  पोलिसांनी सांगितले की, आरोपींना निधी कसा मिळाला आणि ते राणा तसेच भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना कसे ओळखतात, त्यांनी मेसेज आणि कॉलद्वारे धमकावले होते ते ही तपासले जाईल.

  मौलवी १६ मेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात

  या प्रकरणात आतापर्यंतची ही तिसरी अटक आहे. गुन्हे शाखेने ४ मे रोजी सुरत येथून मोहम्मद सोहेल उर्फ ​​मौलवी अबुबकर तिमोल (२७) या मौलवीला अटक केली होती. सुरत जिल्ह्यातील कथोर येथील मदरशात शिकवणारा मौलवी १६ मेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. यासंबंधीचे वृत्त एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिले होते.

  २४ मे पर्यंत पोलीस कोठडी

  गेल्या आठवड्यात या प्रकरणी शहनाज उर्फ ​​मोहम्मद अली मोहम्मद साबीर (25) याला बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक करण्यात आली होती. शनिवारी त्याला सुरत येथे आणण्यात आले व दुसऱ्या दिवशी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलवी शहनाजच्या नियमित संपर्कात होता आणि प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात द्वेष पसरवल्याबद्दल हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता. दोन्ही आरोपींच्या चौकशीत रझाचे नाव पुढे आले, असे पोलिसांनी सांगितले.