ठाकरे गटाची पुढील रणनीती काय? आज उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपतेय, उद्धव ठाकरे काय बोलणार? आजच्या भाषणाकडं लक्ष…

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं.

  मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray group) (शिवसेना) प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत (२३ जानेवारी) सोमवारी म्हणजे आज संपणार आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक (EC) आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्यामुळं रिगल सिनेमा समोरील पुतळ्याल उद्धव ठाकरे पुष्पहार अर्पण करुन अभिवाद करणार आहेत, त्यानंतर ते सायन येथे सभा घेणार आहेत, त्यामुळं या सभेत उदधव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

  आज मुदत संपतेय…

  दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

  उदधव ठाकरे काय बोलणार?

  आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्यामुळं रिगल सिनेमा समोरील पुतळ्याल उद्धव ठाकरे पुष्पहार अर्पण करुन अभिवाद करणार आहेत, त्यानंतर ते सायन येथे सभा घेणार आहेत. तसेच त्यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपतेय, त्यामुळं या सभेत उदधव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

  केव्हा झाली होती निवड?

  १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदावर कुठलीही नियुक्ती झाली नाही. शिवसेनाप्रमुख एकच होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच राहतील अशी भावनिक भूमिका त्यावेळी शिवसेनेनं घेतली. त्यानंतर २०१३ मध्ये उद्धव ठाकरे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केली गेली. २३ जानेवारी २०१८ या दिवशी पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच निवड झाली. त्याची आज मुदत संपतेय.