महाविकास आघाडीची भूमिका काय?; कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर, इच्छुकांची माेर्चे बांधणीला सुरुवात

आमदार (MLA) मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाली असुन, आता इच्छुकांनी माेर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ही पाेट निवडणुक बिनविराेध हाेणार का ? हे महाविकास आघाडीच्या भूमिकेवर ठरणार आहे.

  पुणे : आमदार (MLA) मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाली असुन, आता इच्छुकांनी माेर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ही पाेट निवडणुक बिनविराेध हाेणार का ? हे महाविकास आघाडीच्या भूमिकेवर ठरणार आहे.

  २७ फेब्रुवारीला मतदान हाेणार

  कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप या दाेघांचे गेल्या महीन्यात दीर्घ आजाराने निधन झाले. यामुळे हे दाेन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त हाेत्या. केंद्रीय निवडणुक आयाेगाने देशातील सहा विधानसभा मतदारसंघ आणि लक्षाद्विप येथील एक लाेकसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अरुणाचल, झारखंड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथील प्रत्येकी एक आणइ महाराष्ट्रातील दाेन विधानसभा मतदारसंघाची पाेट निवडणुक हाेणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारी राेजी मतदान हाेईल आणि २ मार्च राेजी मतमाेजणी हाेणार आहे.

  पाेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांकडून माेर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपकडून मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाताे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळाली म्हणजे विजय निश्चित झाल्यासारखे असते. या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, धीरज घाटे हे उमेदवारीसाठी दावा सांगू शकतात. तसेच खासदार गिरीष बापट यांच्याकडूनही कुटुंबातील सदस्याकरीता प्रयत्न हाेण्याची शक्यता आहे.

  महाविकास आघाडी काय करणार?

  महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापुर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस यांच्या आघाडीत काॅंग्रेसकडे हाेता. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काॅंग्रेसकडून निवडणुक लढविली हाेती. तसेच या मतदारसंघात शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे हे देखील रिंगणात उतरले हाेते. पाेट निवडणुक बिनविराेध हाेणार का ? हे महाविकास आघाडी काय निर्णय घेणार यावर चित्र अवलंबुन आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून रुपाली पाटील यांनी यापुर्वीच निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. तसेच काॅंग्रेसकडून माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर हे देखील पक्षाने संधी दिली तर निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात शिवसनेला मानणारा मतदार आहे, त्यामुळे शिवसनेची भुमिका महत्वाची ठरू शकते.

  चिंचवड मतदारसंघात जगतापचं

  चिंचवड मतदारसंघ हा लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व असलेला भाग आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये असताना, त्यांनी बंडखाेरी करीत आमदार म्हणून निवडुन आले हाेते. ते त्यानंतर ते राष्ट्रवादी काॅंग्रेसशी संलग्न राहीले हाेते. १९९४ साली आणि २०१९ या सलग दाेन निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेत विजय मिळविला हाेता. त्यामुळे भाजपकडून जगताप कुटुंबियापैकी एकाला उमेदवारी देण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगतापांच्या नंतर त्यांची पत्नी की त्यांचा भाऊ? या चर्चेला त्यांच्या कुटुंबियांनी पूर्णविराम लावला आहे. जगतापांचा राजकीय वारसा त्यांचे बंधु आणि माजी नगरसेवक शंकर जगताप हेच पुढे चालवतील, पोट निवडणुकीत तेच उमेदवार असतील, असे जगताप कुटुंबियांनी जाहिर केल्याचे समजते.