आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? कोणता नवीन बॉम्ब फुटणार? उद्या अधिवेशनाचं सूप वाजणार, विरोधक ‘यावरुन’ सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता, कारण…

सीमा भाग, मुख्यमंत्री जमीन घोटाळा, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, तसेच 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या इमारतीमध्ये आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहेत, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. त्यामुळं आज कोणता नवीन बॉम्ब फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा सुरु आहे, तर आजचा नववा दिवस आहे. उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे. हे अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, या अधिवेशनात अनेक मुद्द्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण, सीमावाद ‘ईएस’ प्रकरण, गायरान जमीन घोटाळा, मंत्री राजीनामा आदीवरुन अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. तर शिंदे गटातील मंत्र्यांचे घोटाळे यावरुन विरोधक राजीनाम्यासाठी आक्रमक होताना दिसत आहेत.

    दरम्यान, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. याच याच मुद्द्यावरुन विरोधक व सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आधी सीमा भाग, मुख्यमंत्री जमीन घोटाळा, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, तसेच 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या इमारतीमध्ये आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहेत, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. त्यामुळं आज कोणता नवीन बॉम्ब फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे, कोरोनानंतर नागपुरात पहिल्यांदाच अधिवेशन होत असल्यामुळं ह्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी विरोधपक्षाने केली होती, मात्र ठरलेल्या वेळेत अधिवेश पार पडणार असल्याचं कालच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांची उणीधुणी काढत चिखलफेक करत आहेत. उद्या अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचे ठराव आणि प्रस्ताव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या दिवशी कोणते निर्णय घेतात आणि विरोधक सरकारला कसे धारेवर धरणार हे दिसणार आहे. आज विरोधक आणखी एका मंत्र्याबाबत घोटाळा उघडकीस करत, कोणते बॉम्ब फोडणार, नवीन मंत्र्यांचे घोटाळे, गौप्यस्फोट होणार का? याकडे सर्वाच लक्ष लागले आहे.