‘जे घरच्यांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार’ ,  शुभांगी पाटील यांचा संगमनेरमध्ये दावा

शुभांगी पाटील यांना संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात यंच्या निवासस्थानी प्रवेश नाकारला आहे. शुभांगी पाटील यांनी थोरात यांना फोन करूनही प्रवेश नाकारला आहे. नाशिक पदवीधरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील प्रचार करण्यासाठी संगमनेर येथील हा प्रकार आहे.

    अहमदनगर – नाशिक पदवीधर मतदार संघ्याच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी वीजय आपलाच असल्याचे सत्यजीत तांबे यांच्या बालेकील्ल्यात म्हनजेच संगमनेरमध्ये येऊन सांगितले आहे. विजय हा माझाच होईल व जे घरच्यांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार असा घाणाघात शुभांगी पाटल्यांनी केला. संगमनेरमध्ये त्यांनी आपल्या प्रचारार्थ शहरातील सय्यद बाबा दर्गा येथे फुलांची चादर चढवली आहे.

    बाळासाहेब थोरातांच्या घरी प्रवेश नाकारला
    शुभांगी पाटील यांना संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात यंच्या निवासस्थानी प्रवेश नाकारला आहे. शुभांगी पाटील यांनी थोरात यांना फोन करूनही प्रवेश नाकारला आहे. नाशिक पदवीधरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील प्रचार करण्यासाठी संगमनेर येथील हा प्रकार आहे. शुभांगी पाटील या सुदर्शन निवासस्थानाच्या गेटवरूनच माघारी फीरल्या.