२३ तारखेला पंतप्रधान मोदींच्या सर्व आरोपांना उत्तर, उद्धव ठाकरे काय बोलणार? सर्वाचे लक्ष…

बाळासाहेबांच्या अभिवादनानंतर उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. सायंकाळी ६. ३० वाजता शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे पंतप्रधाना मोदींच्या सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत.

    मुंबई- काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत आले आहेत. दरम्यान, हा कार्यक्रम मोठ्याने तसेच भव्य दिव्य असा साजरा करण्यात आला. दरम्यान, सर्व विकासकामांचे मोदींनी लोकार्पण व भूमिपूजन केल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत, विविध मुद्दांवर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी मुंबई पालिकेतील भ्रष्टाचारावर टिका केली. तसेच विकासासाठी राजकारण करु नका असं उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टिका केली होती. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टिका केली होती.

    आरोपांना उत्तर देणार

    दरम्यान, सोमवारी २३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) मेळावा घेणार आहेत. बाळासाहेबांच्या अभिवादनानंतर उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. सायंकाळी ६. ३० वाजता शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे पंतप्रधाना मोदींच्या सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत. येत्या सोमवारी रिगल सिनेमासमोर सायंकाळी ५ वाजता यावेळी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यात येईल, त्यानंतर सायनला सभा होईल.

    खोके सरकारचा भोंगळ कारभार

    महाराष्ट्रातील खोके सरकारचा भोंगळ कारभार, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी यावर उद्धव ठाकरे कसा प्रहार करतात याविषयी उत्सुकता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर लगेचच हा मेळावा होत असल्याने उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.