
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओपन कॅंटिंग परिसरात शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन कुटूंबाकडील कुत्र्यांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर ते न सोडविल्यावरून एका तरुणाला कुत्र्याच्याच बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १७ डिसेंबर रोजी दुपारी हा प्रकार घडला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओपन कॅंटिंग परिसरात शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन कुटूंबाकडील कुत्र्यांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर ते न सोडविल्यावरून एका तरुणाला कुत्र्याच्याच बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १७ डिसेंबर रोजी दुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात ओमकार बोत्रे (वय २१) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून शेजारील प्रतिक मदने या तरुणावर गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार ओमकार व प्रमोद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेवक चाळ या ठिकाणी शेजारी शेजारी राहतात. शनिवारी दुपारी तक्रारदार यांच्या स्नो नावाच्या कुत्र्यात व प्रतिक यांच्या कुत्र्यांमध्ये भांडण सुरू झाले. तेव्हा, प्रतिकने ओमकारला हे भांडण सोडवण्यास सांगितले. पण, ओमकारने त्याला मी, भांडणात पडणार नाही असे म्हणत तेथून निघून गेले. त्याचवेळी प्रतिकने पाठीमागून येऊन हातातील कुत्र्याच्या बेल्टने डोक्यात मारून जखमी केले.