हॉर्वेस्टर यंत्राच्या साह्याने गव्हु मळणी, यंदा उत्पादनात वाढ होणार; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

गव्हु मळणीसाठी हॉर्वेस्टर मशिन दाखल झाली आहेत. रब्बी हंगामातील गहू मळणीची कामे सुरू झाली असुन शेतकरी हॉर्वेस्टर यंत्रांच्या साह्याने मळणी करत आहेत.

आंबेगाव : तालुक्याच्या पूर्व भागात गव्हु मळणीसाठी हॉर्वेस्टर मशिन दाखल झाली आहेत. रब्बी हंगामातील गहू मळणीची कामे सुरू झाली असुन शेतकरी हॉर्वेस्टर यंत्रांच्या साह्याने मळणी करत आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, शिंगवे, वळती, रांजणी, नागापूर, भागडी , थोरांदळे आदी गावांमध्ये दरवर्षी रब्बी हंगामात गव्हाचे पिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. यंदा सुरुवातीपासूनच गव्हाला अनुकूल वातावरणाची साथ मिळाल्याने सर्वत्र गव्हाचे पिक जोमदार आले आहे. थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने यंदा उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गहू पिकाची मळणी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे .परराज्यातून हॉर्वेस्टर यंत्रे दाखल झाली आहेत.

दरवर्षी या परिसरात फेब्रुवारी महिन्यात पंजाब, हरियाणा या परराज्यातील हॉर्वेस्टर यंत्रे गव्हाच्या मळणीसाठी दाखल होत असतात. हॉर्वेस्टर यंत्रांमुळे कमी वेळात, कमी कष्टात गव्हाची मळणी होते तसेच मजुरांची टंचाई त्यामुळे हॉर्वेस्टर यंत्राद्वारे गहू मळणीला शेतकऱ्यांची पसंती असल्याचे दिसून येते.

गव्हाच्या मळणीसाठी हॉर्वेस्टर वाले एकरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर घेत आहेत. या वर्षी गव्हाचे पीक चांगले आल्यामुळे हार्वेस्टरचा व्यवसाय चांगला होईल असे वळतीचे हॉर्वेस्टर मालक गुलाब गांजवे यांनी सांगितले.