निवडणूक आली की माेदी रडतात ; संजय राऊत यांची पंतप्रधानांवर घणाघाती टीका

राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी ११ दिवस पंतप्रधान माेदी ब्लॅंकेटवर झाेपल्याच्या बातम्या आल्या. मात्र देशातील काेट्यवधी जनता राेज फूटपाथवर झाेपे, याकडे मात्र या भाजपावाल्यांचे लक्ष नाही. ११ दिवस उपवास करून राममंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याची पाेपटपंची करणाऱ्यांनी देशातील ४० काेटी जनता राेजच अर्धपाेटी झाेपे, याकडे मात्र यांचे लक्ष नाही.

    नाशिक : प्रभू श्रीराम एकवचनी हाेते, सत्याचे समर्थन करणारे हाेते. आजचे पंतप्रधान मात्र ढाेंगी आणि लबाड आहेत. नाशिक दाैऱ्यावर आले असताना कांदा उत्पादकांचे प्रश्न साेडवू, असे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांनी आताच्या नाशिक दाैऱ्यात मात्र एक शब्दही उच्चारला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांना महत्त्वाचे वाटत नाही, असे पंतप्रधान काय कामाचे? नाशकात येऊन मंदिर झाडण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवले असते तर सर्वसामान्य जनतेलाही खराेखरच रामराज्य येईल, असा आशावाद वाटला असता, असे म्हणत खा. संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली. (Sanjay Raut criticises PM Modi)

    राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी ११ दिवस पंतप्रधान माेदी ब्लॅंकेटवर झाेपल्याच्या बातम्या आल्या. मात्र देशातील काेट्यवधी जनता राेज फूटपाथवर झाेपे, याकडे मात्र या भाजपावाल्यांचे लक्ष नाही. ११ दिवस उपवास करून राममंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याची पाेपटपंची करणाऱ्यांनी देशातील ४० काेटी जनता राेजच अर्धपाेटी झाेपे, याकडे मात्र यांचे लक्ष नाही. आजवरचा इतिहास पाहिला तर निवडणुका आल्या की पंतप्रधानांना सभेत रडू काेसळते. हे मगरीचे अश्रू काढून सर्वसामान्य जनतेला आता तुम्ही फसवू शकणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

    देशाचे रक्षण करताना पूलवामा येथे ४० जवानांना वीरमरण आले त्यावेळी भाजपाच्या नेत्यांना अन‌ पंतप्रधानांना अश्रू आले नाहीत. आता मात्र निवडणुका आल्यामुळे जिथे गेले तिथे अश्रू काढून सर्वसामान्य जनतेला वेड्या काढण्यासाठी पंतप्रधान पुढे सरसावले आहेत, मात्र आता या नाटकांना सर्वसामान्य जनतेने ओळखले असून, आता ही जनता फसणार नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली.

    राममंदिराच्या नावाने घराेघरी जाऊन अक्षदा वाटल्या. त्याऐवजी त्यांनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला १५ – १५ लाख देणार असल्याचे आश्वासन दिले हाेते. ते १५-१५ लाख रुपये घेऊन आले असते तर सर्वसामान्य जनतेेने निश्चितच त्यांचे स्वागत केले असते. मात्र या गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांना त्यांनी दिलेले आश्वासनही आज लक्षात नाही, हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेत काेणतेही गट-तट नाहीत. शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची अन‌ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील. गद्दारांनी कटकारस्थन करून शिवसेना बळकावण्याचा प्रयत्न केला तरी ताे कधीही पूर्ण हाेणार नाही, असेही ते यावेळी बाेलताना म्हणाले.