राष्ट्रवादीचे नेते बेताल वक्तव्य करत असताना, स्वत:ला हिंदुत्वाचे कैवारी समजणारे शांत कसे? “हे ऐकताना उद्धवजी, आदित्यजी तुमचे रक्त का उसळत नाही”, राम कदम यांचा संतप्त सवाल…

जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबच्या वक्तव्यानंतर नवा वादाला तोंड फुटले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, तर अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, आज यावर भाजपा विरुद्ध शिवसेना (ठाकरे) असा सामना रंगला आहे. तर भाजपाने काही संतप्त सवाल शिवसेनेला विचारले आहेत.

  मुंबई– छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. स्वराज्य रक्षक ही उपाधी त्यांच्या नावापुढे लावण्यात आली आणि तिच योग्य आहे असं वक्तव्य अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यावरून उमटणारे पडसाद थांबताना नाव घेत नाहीत. तोच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबच्या वक्तव्यानंतर नवा वादाला तोंड फुटले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, तर अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, आज यावर भाजपा विरुद्ध शिवसेना (ठाकरे) असा सामना रंगला आहे. तर भाजपाने काही संतप्त सवाल शिवसेनेला विचारले आहेत.

  तुमचे रक्त का उसळत नाही?

  दरम्यान, आज यावरुन सामनातून भाजपा व राज्यपालांवर टिका केल्यानंतर त्याला भाजपाकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, यावर आता भाजपा आमदार राम कदम यांनी औरंगजेब क्रूर नव्हता तर कोणी संत होता का? असा सवाल विचारला आहे. तसेच हे सर्व होत असताना, स्वत:ला हिंदुत्वाच कैवारी म्हणून घेणारे शांत कसे. हे ऐकताना उद्धवजी व आदित्यजी तुम्हाला राग येत नाही का? तुमचे रक्त पेटून उठत नाही का? असा संतप्त सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

  काय म्हणाले आशिष शेलार?

  दरम्यान, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तीन ट्विट करत ठाकरे गटाला काही सवाल विचारले जोरदार टिका केली आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- मा.अजित पवार? औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता – मा.जितेंद्र आव्हाड? दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक “औरंगजेबी” चाल तर नाही ना? मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय? काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत? आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे, अशा प्रकारे ट्विट करत त्यांनी ठाकरे गटावर बोचरी टिका केली आहे.

  काय म्हटलंय सामनातून?

  दम्यान, अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. ”छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले, असं सामनातून म्हणण्यात आलं आहे. संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. हा शौर्याचा व धर्मरक्षणाचा वारसा संभाजीराजांनी आपल्या राजश्री आबासाहेबांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला, असं सामनातून म्हटले आहे.

  काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

  “छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. असं आव्हाड म्हणाले आणि नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पुढे आव्हाड म्हणाले की, तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की, उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असं आव्हाडांनी म्हटलेय.”