पगारातून वसुलीचे राजापूर गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश

शासनाच्या ०९ सप्टेंबर २०१९ च्या परिपत्रकानूसार ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे मुख्यालयी राहत असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे.

    राजापूर तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक, आणि ग्रामविकास अधिकारी हे शासनाच्या मुख्यालयी न राहता अनधिकृतपणे घरभाडे घेत असल्याने आजपर्यंतचे त्यानी घेतलेले घरभाडे त्यांच्या पगारातुन घेण्याचे आदेश राजापूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यानी दिले आहेत .

    शासनाच्या ०९ सप्टेंबर २०१९ च्या परिपत्रकानूसार ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे मुख्यालयी राहत असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे. आजपर्यंत फक्त सरपंच दाखले आणि पोलीस पाटील दाखले घेऊन सन २०१९ पासुन अनधिकृत पणे घरभाडे घेत असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. मात्र त्याकडे वरीष्ठ अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करत ०९ सप्टेंबर २०१९ परिपत्रक च्या विरोधात जाऊन त्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांचे वेतन नियमित पणे अदा करीत होते .

    या तक्रारींची दखल घेत राजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विवेक गुंड यांनी जा.क्र. पसरा/सप्रवी/८४६/२०२४ दि.२३/०२ २४ च्या पत्राने २०१९ च्या परिपत्रकानुसार जे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत अथवा तसा ग्रामसभा ठराव कार्यालयाच्या दप्तरी उपलब्ध नाही, अश्या ग्रामसेविकांची वसूली घेण्यात यावी, वसुली घेताना पूर्वीचे वेतन देयके अभिलेख पडताळणी करून त्याप्रमाणे दरमहा पगारातून वसुली करण्यात यावी अश्या आशयाचे आदेश सामान्य प्रशासन च्या विभागामार्फत दिले आले आहेत.

    ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे मुख्यालयी न राहता अनधिकृतपणे घरभाडे घेत असल्याची बाब पुढे आली असतानाच आता अनेक प्राथमिक शिक्षकही या परिपत्रकाचे उल्लनघन करत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे आता राजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी या अशा शिक्षकांच्या पगारातुनही घरभाडे वसुल करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत .