
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त काही लागेना. विरोधकांकडून डागण्यात आलेल्या टीकास्त्रांनंतर २० मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला. मात्र, आता जानेवारी महिना उलटून गेलाय तरी अद्याप पुढील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काही हालचाली नाहीत. पण बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही प्रतिक्रिया दिली आहे.
धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? शिंदे गटाचं की ठाकरे गटाचं? याचा निर्णय निवडणूक (Election) आयोगाकडे प्रलंबित आहे. पण त्याआधीच प्रहारचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी भाकीत केलंय. शिवाय, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे त्यांनी सांगितलं. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त काही लागेना. विरोधकांकडून डागण्यात आलेल्या टीकास्त्रांनंतर २० मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला. मात्र, आता जानेवारी महिना उलटून गेलाय तरी अद्याप पुढील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काही हालचाली नाहीत. पण बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही प्रतिक्रिया दिली आहे.
आता बच्चू कडूंनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत प्रतिक्रिया देत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. धनुष्यबाणाचा निर्णय आला की लगेच दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले आहे. “धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबला आहे. मंत्रिमंडळ विस्तार करू नये, अशी सरकारची कोणतीच मानसिकता नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही भेट घेतली तेव्हा त्यांनीही मान्य केलं की, एकाच व्यक्तीवर जास्त खात्याचा भार आहे. त्यामुळे ताण येत आहे आणि महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असं त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या निर्णयावरच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला आहे असं वाटतं. निर्णय झाला की विस्तार होईल, असेही कडू म्हणाले.
मंत्री होण्यावरून मतभेद
दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांना मंत्री व्हायचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विसंवाद वाढला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम वारंवार पुढे ढकलला जात असताना, सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केवळ 20 मंत्री आहेत. त्यामुळे मंत्र्यांवर कामाचा मोठा ताण आहे. मात्र निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांना विस्ताराचा निर्णय घेता आलेला नाही.
धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार?
धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार यावरही बच्चू कडूंनी आपलं भाकीत दिलंय. धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळणार की ठाकरे गटाला हे ठरणार आहे, यावर प्रहारचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार आहे आमदार, खासदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संख्या ही शिंदे गटाकडे जास्त आहे. यापूर्वी धनुष्यबाणासंदर्भात जे निर्णय आले त्याचा विचार करता शिंदे गटाकडेच धनुष्यबाण जाणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.