“अचानक औरंगजेबाच्या औलादी कोठून पैदा झाल्या?” : देवेंद्र फडणवीस

अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. हे कोण करीत आहे तपासून बघावे लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

    आम्ही कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही. कोणीही औरंगजेबाचे उदात्तीकरण करु शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे नव्याने पैदा झाले आहेत, त्यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच, पण औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्याला डाग लागतो. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

    महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी केलंच, तर साहजिक संताप होतोच, पण त्यासाठी कोणी कायदा हातात घेतला, तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही. राज्यातील काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. जे त्याचे फोटो, स्टेटस ठेवून दुर्भावना निर्माण होत आहे. या कारणाने तणाव निर्माण होत आहे. यामागे कोण आहे, हे शोधावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.