Maratha Reservation
Manoj Jarange's counter attack on Chhagan Bhujbal

ओबीसींमधील कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्यावे अशी मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेसाठी, कार्यक्रमासाठी निधी कुठून येतो, असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

  जालना : ओबीसींमधील कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्यावे अशी मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेसाठी, कार्यक्रमासाठी निधी कुठून येतो, असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

  100 एकरात शेती साफ करून मैदान तयार केले जात आहे. त्यासाठी 7 कोटी रुपयेदेखील जमा केले आहे. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. जालनातील अंतरावली गावात मराठा आरक्षणासाठीची सभा पार पडणार आहे. या सभेला मनोज जरांगे संबोधित करणार आहे. यासाठी मोठी तयारी सुरू आहे.

  भुजबळ म्हणाले, आपला मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध आहे. आपण 54 टक्के आहोत म्हणजेच 7 कोटी ओबीसी समाज आहोत. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे ओबीसी श्रीमंत झाला असे नाही. अजूनही झोपडपट्टीत ओबीसी समाज राहत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील ओबीसी आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नये.

  खुशाल चौकशी लावा

  आंदोलन व सभेसाठी आम्ही वर्गणी गोळा केली. समाजातील जनतेने हा पैसा गोळा केला आहे. तुम्हाला जर शंका असेल तर खुशाल चौकशी लावा. आम्हाला मिळणाऱ्या आरक्षणात मिठाचा खडा टाकू नये. सरकारला दिलेली मुदत दोन दिवसांत संपणार आहे. समोर काय करायचे ? यासाठी सभा आयोजित केली आहे.

  • मनोज जरांगे, आंदोलनकर्ते.