नागरीकांकडून वसूल केलेला पैस जातो कुठे? भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा केडीएमसी प्रशासनाला सवाल

    कल्याण : रस्ते, पाणी आणि आरक्षीत मैदानावरील अतिक्रमण हे अनेक प्रश्न आहेत. नव्या आयुक्तांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व आयुक्त आश्वासने देतात. केडीएमसीत ८० टक्के निधी राज्य आणि केंद्र सरकारकडून आला आहे. तर मग महापालिकेचा पैसा जातो कुठे हे तपासण्याची गरज आहे. नागरीकांकडून विविध करांच्या स्वरुपात महापालिका वसूली करते. त्यापैकी २५ टक्के सुद्धा खर्च होत नाही असे खळबळजनक विधान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे.

    कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गायकवाड यांनी यापूर्वी भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली होती. कल्याण पूर्वेतील विविध समस्या संदर्भात दांगडे यांच्याकडे सांगितले होते. समस्या सुटतील असेआश्वासन दांगडे यांनी दिले होते. मात्र दांगडे यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर आयुक्त इंदूराणी जाखड या रुजू झालेल्या आहेत. भाजप आमदार गायकवाड यांनी त्याच समस्यांसंदर्भात आयुक्त जाखड यांची भेट घेतली. भेटी नंतर त्यांनी समस्यांसदर्भात जाखड यांना माहिती दिली. यावेळी भाजप आमदार गायकवाड यांनी सांगितले कल्याण पूर्वेत १०० फूटी रस्त्याचा प्रश्न, माधव इमारतीचा प्रश्न, पाणी समस्या आहे. रस्ते चांगले नाहीत. आरक्षीत मैदानांवर आतिक्रमण झाले आहे. मी या पूर्वी देखील आयुक्तांना भेटलो होतो. या आयुक्तांनाही भेटलो आहे. सर्व आयुक्त आश्वासनेच देतात. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राज्य आणि केंद्र सरकारकडून कोट्यावधीचा विकास निधी आला आहे. जवळपास ८० टकके केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. महापालिका नागरीकांकडून कर स्वरुपात पैसा वसूल करते. परंतू २५ टक्के पैसा सुद्धा खर्च केला जात नाही. मग हा पैसा जातो कुठे याचा तपास लागला पाहिजे असे गायकवाड यांनी सांगितले.