दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण कुठे होतो? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढला. त्यानंतर सरकारला विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. आमच्यावर कितीही चौकशी लावली तरी आम्ही डगमगणार नाही, असेही आदित्य यांनी सांगितले. 

    नागपूर : दिशा सालियनच्या (Disha Salian) आत्महत्या प्रकरणात शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून लक्ष्य करण्यात येत असलेले आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मौन सोडले आहे. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे त्यांनी म्हटले. आजोबा (रश्मी ठाकरे यांचे वडील) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

    आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढला. त्यानंतर सरकारला विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. आमच्यावर कितीही चौकशी लावली तरी आम्ही डगमगणार नाही, असेही आदित्य यांनी सांगितले.

    दिशा सालियानची आत्महत्या झाली नसून तिची हत्या झाली असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. विधानसभेत नितेश राणे यांनी दिशा सालियानचा मृत्यू झाला त्या पार्टीत कोण होते, सीसीटीव्हीचे फूटेज (CCTV Footage) का गायब आहेत, व्हिजिटर बुकमधील पाने का फाडली गेली आहेत, असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली. तर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ४४ वेळा फोन केलेली AU नावाची व्यक्ती कोण याची चौकशी करण्याची मागणी केली. त्याशिवाय, दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी गोगावले यांनी सभागृहात केली होती.