“विखे जिथे जातात…, विरोधात काम करतात; ऐकलं होतं आता प्रत्यक्ष अनुभव घेतला” राम शिंदे-विखे पाटील यांच्यात जुंपली, ‘या’ कारणावरुन…

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली आहे.

    अहमदनगर : राज्यात एकिकडे विरोधक सत्ताधारी ऐकमेकांवर चिखलफेक करत असताना, आता भाजपा पक्षातच कुरघोडी या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. कारण अहमदनगरमध्ये (Ahmednagar) माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोप तसेच संघर्ष सुरु आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली आहे. आणि याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

    काय म्हणाले राम शिंदे?

    दरम्यान, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरुन राम शिंदे व विखे पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. संतापलेल्या राम शिंदेंनी आपल्याच पक्षातील विखे पाटलांवर बोचरी टिका केली आहे. “विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात हे ऐकलं होतं, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला” असंही राम शिंदे म्हणाले. त्यामुळं राम शिंदेंनी केलेली टिका विखे पाटलांच्या जिव्हारी लागली आहे.

    सभापतींची चिठ्ठीने निवड…

    1960 साली स्थापन झालेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा पहिल्यांदाच समसमान जागा मिळाल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. तसेच सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये सरळ लढत झाली. विशेष म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांना 9-9 जागा मिळाल्या.