दुकानांवर कारवाई होणार की नाही, की आम्ही तोड फोड करायची – मनसेचा आस्थापना नोंदनी विभागाला इशारा

कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक दुकानांवर आजही इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये नामफलक दिसून येत आहेत. काही दुकानदार छोट्या अक्षरात एका कोपऱ्यात मराठी नाव लिहून हे सोपस्कार पूर्ण करत आहेत.

    कल्याण-डोंबिवली : मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार की नाही, की आम्ही तोड फोड करायची असा सज्जड इशारा मनसेने कल्याण मधील व्यवसाय व दुकाने आस्थपणा नोंदनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. मराठी भाषेत नाम फलक न लावणाऱ्या दुकानदारां विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण डोंबिवलीत अद्यापही मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई सुरू न झाल्याने आज मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्या नेतृत्वाखाली माणसं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यवसाय व दुकाने आस्थापना नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.

    कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक दुकानांवर आजही इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये नामफलक दिसून येत आहेत. काही दुकानदार छोट्या अक्षरात एका कोपऱ्यात मराठी नाव लिहून हे सोपस्कार पूर्ण करत आहेत. केडीएमसीने मराठी भाषेत नाम फलक लावण्यासाठी संबंधित दुकानदारांना वारंवार आवाहन केले तर कारवाईचे अधिकार व्यवसाय व दुकाने आस्थापना नोंदनी विभागाकडे केलं असल्याचं केडीएमसीने स्पष्ट केलं. मुदतीनंतर ही मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसाठी अद्यापही व्यवसाय व दुकाने आस्थापना नोंदनी विभागाला कारवाईसाठी मुहूर्त मिळालेला नाही. कल्याण डोंबिवलीत देखील मराठी पाट्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेकडील व्यवसाय व दुकाने आस्थापना नोंदनी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाब विचारला. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने अद्याप आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगताच मनसे पदाधिकारी संतापले. तुम्ही प्रमोशनचा सातव्या वेतनचा जीआर कसा पटकन डाऊनलोड करता मग न्यायालयाचा हा आदेश का डाउनलोड केला नाही असा सवाल मनसे शहर अध्यक्ष कामत यांनी केला. कारवाई होणार नसेल तर कायदा काय कामाचा, कार्यालये बंद करा, तसेच मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई होणार की नाही, की आम्ही तोडफोड करायची असा इशारा देखील यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.