दहा हजारांची लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; एलसीबीची कारवाई

एका व्यावसायिकाला पैशासाठी जीएसटी (GST) अंतर्गत केस करून कारवाईची धमकी देणाऱ्या विशाल बाबू हापटे (वय ३५ वर्षे, पद - राज्य कर निरीक्षक, रा.शिवाजी तालीम जवळ,जैन बस्ती, हातकणंगले) या अधिकाऱ्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून कारवाई केली.

    कोल्हापूर : एका व्यावसायिकाला पैशासाठी जीएसटी (GST) अंतर्गत केस करून कारवाईची धमकी देणाऱ्या विशाल बाबू हापटे (वय ३५ वर्षे, पद – राज्य कर निरीक्षक, रा.शिवाजी तालीम जवळ,जैन बस्ती, हातकणंगले) या अधिकाऱ्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून कारवाई केली.

    तक्रारदार यांच्या मित्राचे टायर्स विक्रीचा व्यवसाय असून, त्या व्यवसायचा जीएसटी भरला नाही म्हणून त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार लाचेची मागणी केली आणि ती लाच रक्कम आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

    दरम्यान, या प्रकरणी आरोपीविरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.