बसमध्ये चढताना गळ्यातील सोनसाखळी लांबवली; संगमनेर बसस्थानकातील घटना

बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गळ्यातील दीड तोळे सोन्याची साखळी (Gold Chain) लांबविल्याची घटना संगमनेर बसस्थानकात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संगमनेर : बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गळ्यातील दीड तोळे सोन्याची साखळी (Gold Chain) लांबविल्याची घटना संगमनेर बसस्थानकात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साकुर येथील अनिल विठ्ठल सोनवणे हे संगमनेरला गेले होते. पुन्हा साकुर येथे येण्यासाठी संगमनेर बसस्थानकात गेले. त्या दरम्यान साकुरला जाणार्‍या बसमध्ये सोनवणे चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली.

    याप्रकरणी अनिल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल धनवट करत आहे.