MP Supriya Sule honored

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. त्यातच आता शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांकडून बैठक घेतली जात आहे. पण याच बैठकीसाठी जात असताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पत्रकारांनी घेरले. त्याचदरम्यान त्यांनी पत्रकारांसमोर थेट हातच जोडले.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. त्यातच आता शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांकडून बैठक घेतली जात आहे. पण याच बैठकीसाठी जात असताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पत्रकारांनी घेरले. त्याचदरम्यान त्यांनी पत्रकारांसमोर थेट हातच जोडले.

    राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील कोणकोणते आमदार या बैठकीसाठी कुठं-कुठं जाणार हे आता पाहिला मिळत आहे. शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी अनेक नेतेमंडळी जात आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे देखील जात होत्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना घेरले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना बाजूला जावून थांबण्याची हात जोडून विनंती केली. वाय. बी. सेंटरमध्ये दुसऱ्याचा भाड्याचा कार्यक्रम असल्याने बाकीच्या भाडेकरुंना त्रास होऊ नये, यासाठी बाजूला थांबा, असे त्यांनी म्हटले.

    दरम्यान, यापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजप-शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर यानंतर राष्ट्रवादी कोणाची यावरुन वाद सुरु आहे, तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष व निवडणूक चिन्हावर आपला दावा केला आहे. तर आमचीच खरी राष्ट्रवादी असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आज दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.