समृद्धी महामार्गाची पाहणी करत असताना, जालन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दाखवले काळे झेंडे

जालन्यात काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीच्या आणि कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जामवाडीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाच्या पाहणी करत असतानाच काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीच्या आणि कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी पोलिसांना आंदोलनकर्त्यांना पुढे जाऊ दिले नाही.

    जालना : पुढील काही दिवसात हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samriddhi Highway) नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा, जालना तसेच नागूपर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून, तिथून मुख्यमंत्री (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री (Devendra fadnavis) यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले.

    दरम्यान, जालन्यात काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीच्या आणि कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जामवाडीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाच्या पाहणी करत असतानाच काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीच्या आणि कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी पोलिसांना आंदोलनकर्त्यांना पुढे जाऊ दिले नाही. तसेच यावेळी इथे मोठा पोलीस फौजफाट तैनात करण्यात आला होता. जालना-समृद्धी महामार्ग जालना जिल्हयाच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून जातो.

    जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42.72 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा / इंटरचेंज 1 असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत.