संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित पवारांनी सवाल विचारला आहे. आमचा पक्ष पहिल्यापासून पुरोगामी विचारांचा आहे.

  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांना धर्मवीर म्हणता येणार नाही. तर ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन वाद वाढत असून, यावरुन राजकारण होताना पाहयला मिळत आहे. दरम्यान, बुधवारी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करताना संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणता धर्मरक्षकच म्हटले पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून संतप्त व संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आज पुण्यात अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका मांडली.

  …तर तुम्ही कोण?

  दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित पवारांनी सवाल विचारला आहे. आमचा पक्ष पहिल्यापासून पुरोगामी विचारांचा आहे. जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाले तेव्हापासून. त्यामुळं महापुरुषांनी जी शिस्त घालून दिली आहे. त्यांचा पगडा आमच्यावर आहे. त्याला धक्का न लागता आम्ही काम करत आहोत, असं पवार म्हणाले.

  राज्यपाल, भाजप नेत्यांसारखे मी चुकीचं बोललो नाही

  पुढे बोलताना पवार म्हणाले की, बाबासाहेबंनी जी घटना दिली आहे, त्यांचे पालन केले पाहिजे. मी जी भूमिका मांडली आहे ती सर्वांना पटलीच पाहिजे असं ही नाही. पण मी भूमिका मांडली जी चुकीची ठरवण्याची अधिकार तुम्हाला कोणी दिला, असं पवार म्हणाले. मी भाजपाच्या नेत्यांसारखे किंवा राज्यपालांसारखे काही चुकीचे वक्तव्य केले नाही. त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार म्हणाले.

  त्यांच्या हातात सत्ता आहे….

  दरम्यान, मला जे योग्य वाटले ते मी बोललो. जनतेला जे वाटेल ते ठरवतील. माझ्यावर केस दाखल करायचे असेल तर करा, त्यांच्याकडे सत्ता आहे, ते काहीह करतील, असं पवार म्हणाले. बेरोजगारी आहे, महागाई आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ही प्रत्येकाला काय वाटते हे विचारणे धंदे बंद करा…असं पवार म्हणाले. त्यांचे विचार वेगळे आहेत, आमचे विचार वेगळे आहेत, विचार मांडताना कोणत्या घटकाला धक्का लागता कामा नये. हे तारतम्य बाळगले पाहिजे. असं अजित पवार म्हणाले.