संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

फडणवीसांवर गुन्हे दाखल करा, त्यांना अडकवा, असे टार्गेट तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. असंही फडणवीस मंगळवारी म्हणाले होते. त्यानंतर मविआकडून हे आरोप फेटाण्यात आले होते.

    मुंबई- मविआ सरकारच्या काळात आपल्या अटकेचा कट करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झालेली आहे. हा कट शरद पवारांनी रचला होता, असा आरोप आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इतकचं नाही तर या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केलीय. फडणवीसांवर गुन्हे दाखल करा, त्यांना अडकवा, असे टार्गेट तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. असंही फडणवीस मंगळवारी म्हणाले होते. त्यानंतर मविआकडून हे आरोप फेटाण्यात आले होते.

    काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते ?

    देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा कट मविआ सरकारच्या काळात रचण्यात येत होता, याला आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही दुजोरा दिला आहे. शरद पवार आणि त्यांचं राजकारण यामागे होतं, असा आरोपही त्यांनी केलाय. ज्यावेळी सदावर्तेंना अटक करण्यात आली होती, त्यावेळी सातत्यानं नागपूर कनेक्शन, संघाशी संबंध आणि फडणवीसांच्या भेटीबाबत पोलिसांकंडून विचारणा करण्यात येत होती, असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे.

    मविआनं आरोप फेटाळले

    देवेंद्र फडणवीस यांनी अटकेच्या कटाचा आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं हे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. असं काहीही घडलेलं नव्हतं, अशी कुणलीही योजना नव्हती, असं स्पष्टीकरण तत्त्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलंय. मात्र त्या काळात वळसे पाटील हे नामधारी गृहमंत्री होते, किंवा ते खोटं बोलत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. मविआच्या काळात भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नाहक, सूडबुद्धीनं अटक करण्यात आल्याचा आरोपही उपाध्येंनी केलाय. फडणवीस यांच्या अटकेच्या कटावरुन येत्या काळात आणखी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.