महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेचा वाली कोण?; नागरिकांचा प्रश्न

निसर्गाची अद्भुत खाण असलेला महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुका सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसला आहे. यातच महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वर पाचगणी तापोळासारख्या निसर्ग संपदेचा पर्यटनाचा अद्भुत खजिना या तालुक्याला लाभला आहे.

    पाचगणी / इम्तियाज मुजावर : निसर्गाची अद्भुत खाण असलेला महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुका सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसला आहे. यातच महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वर पाचगणी तापोळासारख्या निसर्ग संपदेचा पर्यटनाचा अद्भुत खजिना या तालुक्याला लाभला आहे. मात्र, हे तीन पर्यटनस्थळ सोडले तर या महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातील विकास अद्यापही 100 वर्षांपूर्वीचाच आहे.

    वर्षानुवर्ष या भागातील जनतेचे आरण्यरूदन अद्यापही संपलेले नाही. या तालुक्याच्या नशिबाने आता याच तालुक्यातील दरे तांब गावचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.

    आता महाबळेश्वर तालुक्यातल्या ग्रामीण भागातील दुर्गम डोंगराळ विभागातील जनतेच्या अशा पल्लवीत झाले आहेत. मात्र, आनंद झाला मात्र समस्या कायम या समस्या सोडवण्यासाठी या तालुक्याला कोणीतरी वाली आहे का? असा सवाल आता जनता विचारू लागली आहे. याच तालुक्याचे जननायक आमदार मकरंद पाटील यांनी गाव वाडी वस्तीपर्यंत दळणवळण विकास पोहोचवला. मात्र, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व या विभागातील दुर्गम भागातल्या जनतेचा कायमस्वरूपीचा पिछाडलेला विकास संपवला गेला नाही. हे मात्र जळजळीत सत्य आहे.