गुहावटीतील सर्व बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतंय? महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेचा संतप्त सवाल

या सर्व नाराजी नाट्यमय घडामोडींनतर आता या सर्व आमदारांचा एवढा मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) राहण्याचा व खाण्याचा खर्चबाबत काही सामान्य जनतेतून संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाचं केंद्रबिंदू हे मुंबईपासून २७३० किमी दूर असलेल्या गुवाहाटीच्या रेडिशन ब्लू हॉटेलमध्ये (Radisson Blu Hotel guhawati) आहे. याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या समर्थक ४२ आमदारांसह थांबलेले आहेत. या सर्व बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतंय असा जनात प्रश्न विचारत आहे.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतमध्ये (Surat) एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्यानंतर ते बुधवारी मध्यरात्रीपासून जवळपास आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhavati) येथे थांबले आहेत. दरम्यान या आमदारांच्या खर्चांबाबत आता काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

    या सर्व नाराजी नाट्यमय घडामोडींनतर आता या सर्व आमदारांचा एवढा मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) राहण्याचा व खाण्याचा खर्चबाबत काही सामान्य जनतेतून संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाचं केंद्रबिंदू हे मुंबईपासून २७३० किमी दूर असलेल्या गुवाहाटीच्या रेडिशन ब्लू हॉटेलमध्ये (Radisson Blu Hotel Guhavati) आहे. याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या समर्थक ४२ आमदारांसह थांबलेले आहेत. याचा प्लॅन सूरतमध्ये (Surat) रचला. शिवसेनेचे बंडखोर आमदार सर्वात आधी सूरतमध्ये पोहचले. त्याठिकाणाहून चार्टर्ड प्लेननं सगळे गुवाहाटीला आले. विशेष म्हणजे बंडखोर २-२, ३-३ गटाने सूरतला पोहचले.

    दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी काळजी भाजपा घेताना दिसते. गुहावटीतील रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये (Radisson Blu Hotel Guhavati) भाजपा (BJP Leader) नेत्यांचा वावर वाढला आहे. सूत्रांनुसार, आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही बंडखोर आमदारांची भेट घेतली आहे. गुहावटीतील रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदारांचा कोण खर्च करत आहे, असा संतप्त सवाल महागाईंन त्रासलेल्या जनता करत आहे. कारण एकिकडे महागाईनं जनता होपळली असताना, निवडूण दिलेल्या आमदारांचे एवढे चोचले कोण पुरवत आहे. कारण एका दिवसाचे या हॉटेलमधील कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडे आहे, खाण्याचे पैसे वेगळे. 44 आमदारांना स्वतंत्र्य रुम दिल्या आहेत. त्यामुळं हा एवढा अवाढव्य खर्च कोण करतंय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. “आम्ही उपाशी आणि बंडखोर आमदार उपाशी…” असा सवाल जनतेला पडला आहे.