आमदार खासदार ठरवणारे रामराजे कोण? दुष्काळी तालुक्यांवर शरद पवार , रामराजे यांचा अन्याय आ.  जयकुमार गोरे यांचा घणाघात

माढा लोकसभेचा कोण खासदार पाहिजे, माण विधानसभेचा आमदार कोण पाहिजे हे त्या कार्यक्षेत्रातील मतदार राजा ठरवेल . हे निर्णय घेणारे रामराजे आहेत कोण ? अशी खरमरीत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली .दरम्यान दुष्काळी माण तालुक्यावर शरद पवार साहेब आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनीच अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

    सातारा : माढा लोकसभेचा कोण खासदार पाहिजे, माण विधानसभेचा आमदार कोण पाहिजे हे त्या कार्यक्षेत्रातील मतदार राजा ठरवेल . हे निर्णय घेणारे रामराजे आहेत कोण ? अशी खरमरीत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली .दरम्यान दुष्काळी माण तालुक्यावर शरद पवार साहेब आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनीच अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

    शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अविनाश कदम, सुनील काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांना पत्रकारांनी रामराजेंनी आम्हाला ते नको आहे त्यांना बाजूला ठेवणार आहे अशी टीका पत्रकार परिषदेत केली होती यावर तुमचे काय मत आहे असे छेडले असता ते म्हणाले, ते ठरवणारे कोण?, आम्ही त्यांच्या छातीवर बसून तीन टर्म आमदार झालो आहे. माढा लोकसभा मतदार संघातली आणि माण विधानसभा मतदार संघातली जनता ठरवेल कोणाला खासदार करायचे कोणाला आमदार करायचे. मैदानात लढताना समोर विरोधक कोण आहे हे ठरवून आम्ही लढत नसतो. कोणीही आमच्या विरोधात असो आम्ही त्याला आस्मान दाखवतोच. आमच्यासमोर कोणी का असेना आम्हाला काही फरक पडत नाही, असाही आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.

    पुढे गोरे म्हणाले, आजपर्यंत दुष्काळी माण तालक्याला दुष्काळीच ठेवण्याच काम शरद पवार साहेब आणि तत्कालिन कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे .आजपर्यंत या दुष्काळी तालुक्यांचा केवळ वापरच झाला . याचे भाग त्यांनी सिंचनाखाली आणून त्यांच्या बागायती पट्टयांसाठी दुष्काळी भागातील टोळ्या कशा नेता येतील अशी व्यवस्था त्यांनी केली रामराजे यांनी राजकीय आकसातून माण व खटाव तालुक्याला पाणी मिळून दिले नाही असा आरोप गोरे यांनी केला .धरणाच्या फेर पाणी वाटपाचा घेतलेला देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अत्यंत धाडसी आहे . जिहे कठापूर, उरमोडी, टेंभू , वसना वांगणा या धरणांमधून न वापरले जाणाऱ्या पाण्याचा फेरआढावा घेऊन तेरा टीएमसी पाणी दुष्काळी माण खटाव तालुक्यासह सांगली व सोलापूरच्या दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन आहे . याची सुधारीत प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे . या धाडसी निर्णयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले .

    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे जंगी स्वागत साताऱ्यात होणार

    भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा साताऱ्यात ४ तारखेला होत आहे. ते साताऱ्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे स्वागत सातारा जिल्ह्यात सकाळी १० वाजता वाई तालुक्यातील बावधन येथे होत = आहे. तेथून ते साताऱ्यात कनिष्क मंगल कार्यालयात येतील. तेथे ३०० पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. तेथून यशोदा कॅप्मस येथे भेट देतील, तेथून सातारा शहरात मोती चौक ते जुना मोटरस्टॅण्ड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यात ते जनतेशी संवाद साधणार आहेत. तेथून ते कराडच्या दिशेने रवाना होतील. कराडात त्यांचे जंगी स्वागत होईल. कराड येथील वेण्णूताई चव्हाण सभागृहात कोअर कमिटीची बैठक होईल. त्यानंतर आझाद चौकापासून ते पायी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधतील, असे त्यांनी सांगितले.