pruthviraj chavhan

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात विधानसभेत बुलढाणा बस दुर्घटनेचा मुद्दा विरोधकांनी सभागृहात मांडला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा मांडत विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला.

    कराड : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात विधानसभेत बुलढाणा बस दुर्घटनेचा मुद्दा विरोधकांनी सभागृहात मांडला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा मांडत विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच महामार्गावरील अपघात टाळण्यासंबंधी सरकारन  कोणत्या उपाय योजना करणार आहे.

    विदर्भ ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर हा मद्यपान करून बस चालवत होता. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. सार्वजनिक प्रवासी बसमध्ये ५० ते ६० प्रवासी असतात. बसमध्ये बसणाऱ्या सर्व लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. महामार्गावर बस आणि इतर वाहनांचे चालक देखील मद्यपान करून वाहन चालवत असतील आणि ज्या प्रमाणे विदर्भ ट्रॅव्हल्स सारखा अपघात होणार असेल तर याला जबाबदार कोण आहे, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केला.

    समृद्धी महामार्गावर पहिल्याच १००४ दिवसांमध्ये ९०० अपघात झाले आणि ३१ जणांचा मृत्यू झाला. महामार्गावर सार्वजनिक आणि खासगी वाहन चालक मद्यपान करून येणार नाहीत, याची जबाबदारी शासन घेईल का? मद्यपान केलं असल्यासं चेक करण्यासाठी ब्रेथ ऍनालायझर टेस्ट असते. त्याप्रमाणे आपण वाहन चालकांची तपासणी करू शकतो आणि कारवाई करू शकतो, असं चव्हाण म्हणाले.

    मुंबई-पुणे महामार्गावर आम्ही आठवड्याला प्रवास करत असतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात माल वाहतूक यांच्या गाड्या असतात. जेव्हा शासनाच्या मनात येतं तेव्हा पोलीस यंत्रणा उभी करून मोठे ट्रक्स फास्ट लेनमधून जात असतील तर त्यांना बाजूला काढण्याची यंत्रणा आहे. परंतु मनुष्यबळ नसल्याचं कारण सांगितलं जातं. अवजड वाहन फास्ट लेनमधून जात आहेत. त्यासाठी राज्य सरकार ठोस यंत्रणा उभी करणार आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही विचारा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भारतात सर्वाधिक अपघात रस्त्यावर होतात आणि कोणतंही कारण नसताना माणसं मृत्यूमुखी पडतात, याची शासनाला जबाबदारी घ्यावी लागेल, असंही चव्हाण म्हणाले.