डोंबिवली नजीकच्या पलावामध्ये कोण चालवितोय ड्रग्जचा धंदा, घर भाड्याने देणाऱ्याच्या विरोधात कारवाई का नाही ?

    कल्याण : पलावा गृह संकुलात ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन जणांना मानपाडा पोलिसानी अटक केली आहे. अरशद खान आणि शदाबुद्दीन सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून ५८ ग्राम एमडी हस्तगत करण्यात आली आहे. हे दोघे उच्चभ्रू संकूलातील किती लोकांना एमडी विकत होते. ते लोक कोण आहेत. इतकेच नाही तर या दोन्ही आरोपींना भाड्याने घर देणाऱ्या घर मालकाविरोधात कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    डोंबिवलीनजीक कल्याण शीळ फाटा रस्त्यालगत असलेल्या पलवा गृह संकुलात एमडी विक्री प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दाेन जणांना अटक केली आहे. या मधील अरशद खान हा तिसऱ्यांदा पकडला गेला आहे. पलवा गृहसंकुलात ड्रग्जचा गोरख धंदा किती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. याचा एक उदाहरण आत्ता समोर आले आहे. या परिसरात सेक्स रॅकेट सुरु असल्याची तक्रार देखील नागरीकांनी वारंवार केली आहे. पलावा हा अवैध धंद्याचे केंद्र बनले आहे का ? पोलिसाकडून वारंवार तपासणी केली जाते. आवाहन केले जाते. परंतू भाड्याने घर देणाऱ्या लोकांना ना कायद्याची पडली आहे. नाही त्यांची कोणती नैतिक जबाबदारी आहे.. चांगले घऱ् भाडे मिळते म्हणून भाड्याने घरे दिली जाता. त्याच घरातून अवैध धंदे सुरु असतात. काही दिवसापूर्वी कल्याण ग्रामीणमधील हेदूटणे परिसरात बांगलादेशी सेक्स रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश खेला होता. त्या प्रकरणात घर भाड्याने देणाऱ््याची विरोधात कारवाई केली गेली होती. त्याच्या विरोधात आरोपीच्या प्रमामेच कलमे लावली गेली होती. परंतू या ड्रग्ज प्रकरणात घर मालाच्या विरोधात कारवाई केली गेली नाही का असा सवालही उपस्थित केला जात आहे.