eknath shinde with all mlas

आमदार संजय शिरसाट अथवा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या सांगण्यानुसार हे बंड स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच घडवले आहे. ठाकरे अडीच वर्षात स्वपक्षीय आमदारांना गृहित धरून अन्य पक्षीय नेत्यांना आणि अन्य पक्षांच्या आमदारांनाच महत्व देत होते असे आता आमदार सांगत आहेत. या वागण्याने तसेच ठाकरेंच्या भोवती वावरणाऱ्या लोकांमुळे आमदार दुरावत गेले, दुखावले गेले आणि या बंडाचा विस्फोट झाला(Who is the mastermind of Eknath Shinde's revolt?).

    आमदार संजय शिरसाट अथवा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या सांगण्यानुसार हे बंड स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच घडवले आहे. ठाकरे अडीच वर्षात स्वपक्षीय आमदारांना गृहित धरून अन्य पक्षीय नेत्यांना आणि अन्य पक्षांच्या आमदारांनाच महत्व देत होते असे आता आमदार सांगत आहेत. या वागण्याने तसेच ठाकरेंच्या भोवती वावरणाऱ्या लोकांमुळे आमदार दुरावत गेले, दुखावले गेले आणि या बंडाचा विस्फोट झाला(Who is the mastermind of Eknath Shinde’s revolt?).

    या बंडाचा चेहरा सध्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत पण त्यांनी कोणाच आमदारांना या चला बंडात सहभागी व्हा, असे सांगितल्याचे दिसत नाही. सारेच स्वखुषीने एकत्र जमले आहेत. त्यांना थांबवण्याची जबरदस्तीही झालेली दिसत नाही. विदर्भातील अकोल्याचे नितीन देशमुख म्हणाले की माझ्यावर जबरीने उपचार केले जात होते पण तरी ते गुवाहाटीला गेलेच होते. तिथून शिंदेंनी सांगितल्या नुसार त्यांचेच दोन कार्यकर्ते देशमुखांना मुंबईत सोडून आले.

    अर्थातच एकदा बंड करण्याचे ठरल्यानंतर त्याच्या कार्यक्रमाची आखणी बरीच आधीपासून सुरू झाल्याचे आता जाणवते आहे. ठाण्यातील शिंदेंचे काही सहकारी हे गेले आठ दहा दिवस सुरत येथेच तळ ठोकून होते असे आता ठाण्यातील त्यांचे निकटवर्ती सांगत आहेत. भाजपा नेत्यांना शिंदे यांनी या घडामोडींबाबत पूर्ण विश्वासात घेतलेच असावे. कारण सूरतपासून गुवाहाटीपर्यंत त्यांना पूर्ण पाठबळ व मदत मिळत होती. सूरतपासून गोहातीपर्यंत चार्टर्ड विमाने फिरत होती. हे सारे नियोजन शिंदेंनीच केले होते. पण तरीही ठाकरेंच्या धोरणांना व आमदारांना गृहित धरण्याच्या प्रवृत्तीलाच या बंडाचा मास्टरमाईंड म्हणावे लागेल का हा खरा प्रश्न आहे.