
सत्ताधारी शिवसेनेशी जुळवून घेत काही राजकीय वादग्रस्त कारवाईसाठी पुढाकार घेणारे आणि त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी प्रयत्न करणारे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ३० जूनला निवृत्त होणार आहेत. पांडे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ न मिळाल्यास पुढचे पोलीस आयुक्त कोण, अशी चर्चा ‘खाकी आणि खादीत’ रंगली आहे. पांडे यांच्या निवृत्तीनंतर बऱ्याच नावांची सुरु झाली असून त्यापैकी राज्य सरकार कोणाला कौल देईल, याबाबत उत्सुकता आहे(Who is the next Commissioner of Police after Sanjay Pandey).
मुुंबई : सत्ताधारी शिवसेनेशी जुळवून घेत काही राजकीय वादग्रस्त कारवाईसाठी पुढाकार घेणारे आणि त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी प्रयत्न करणारे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ३० जूनला निवृत्त होणार आहेत. पांडे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ न मिळाल्यास पुढचे पोलीस आयुक्त कोण, अशी चर्चा ‘खाकी आणि खादीत’ रंगली आहे. पांडे यांच्या निवृत्तीनंतर बऱ्याच नावांची सुरु झाली असून त्यापैकी राज्य सरकार कोणाला कौल देईल, याबाबत उत्सुकता आहे(Who is the next Commissioner of Police after Sanjay Pandey).
संजय पांडे यांनी मुदतवाढ मागितल्याचा इन्कार केला असला तरीही त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, राज्य सरकारने पाठवलेला मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडून मान्य झाला तरच पांडे यांना मुदतवाढ मिळू शकते. हेमंत नगराळे यांच्या कार्यकाळात लालफितीत अडकलेल्या फाईली काढून कारवाई करण्यासाठीच संजय पांडे यांना आयुक्तपदाच्या खुर्चीवर बसविण्यात आले होते.
पांडे यांनी पद स्वीकारताच वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यासह केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू असताना, पांडे यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या, नवनीत राणा, मोहित कंबोज आदी प्रकरणात राज्य सरकारला अपेक्षित भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पांडे यांच्यावरील आघाडी सरकारचा स्नेह कमी झाला.
दरम्यान, संजय पांडे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मिरा भाईंदरचे आयुक्त सदानंद दाते यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर या पदासाठी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, डॉ. भूषण कुमार उपाध्याय, पोलिस गृहनिर्माण विभागाचे विवेक फणसळकर, संदीप बिश्नोई, ठाणे आयुक्त जय जीत सिंग, पुण्याचे सीपी अमिताभ गुप्ता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे प्रभात कुमार इच्छुक असल्याची चर्चा आहे.
पांडे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच सिटीझन फोरमची स्थापना, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, संडे स्ट्रीट हे उपक्रम सुरु केले. मात्र या उपक्रमांमुळे पोलिसांवरील ताण वाढल्याची कुजबूज पोलीस खात्यातच सुरु आहे. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मराठी अधिकाऱ्याला आयुक्तपदी संधी मिळेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.