त्यांना कोण ओळखत होतं? ठाण्याच्या गल्लीबाहेर तरी त्यांना कोणी विचारत होतं का?; खासदार अरविंद सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचं आठवतं का? ते कधी प्रभावी नेते होते का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. त्यांना काय करायचं ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

    यवतमाळ: ठाकरे गट शेतकरी प्रश्नावरुन आक्रमक झाला आहे. खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यवतमाळमध्ये ठाकरे गटाने पहिल्यांदाच जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. या निमित्ताने ठाकरे गट यवतमाळमध्ये शक्तीप्रदर्शन करत आहे. या मोर्चाचं नेतृत्व अरविंद सावंत करत आहेत. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला.

    दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचं आठवतं का? ते कधी प्रभावी नेते होते का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. त्यांना काय करायचं ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला. ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर त्यांना कोणी विचारत होतं का विचारा ना? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही नावं घेता सगळीकडे. तुम्ही शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव घेऊन सर्वत्र फिरता, पण याआधी तुम्हाला किता लोकं ओळखत होती, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबईचं सुशोभिकरण करणार असल्याच्या वल्गना केल्या जात आहे. मूळात सुशोभिकरणाची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. ही संकल्पना कृतीत येण्याच्या वेळी पाठित सुरा खुपसला गेला. आता त्याचं भांडवल केलं जात आहे, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, यावेळी शिवसेनेनं शेतकऱ्यांसाठी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तसेच विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.