मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? नितेश राणे, प्रवीण दरेकरांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

मंत्रिमंडळात कोणाकोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अशी सुत्रांची माहिती आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादीत भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर (Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan, Ravindra Chavan, Radhakrishna Vikhe Patil, Praveen Darekar, Nitesh Rane, Babanrao Lonikar) यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

    मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) अस्तित्वात येऊन एक महिना होऊन गेला तरी, सुद्धा अजून राज्यात मंत्रिमंडळ (Cabinet ministers) तयार झालेले नाहीय, त्यामुळं अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसलेले आहेत, त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का? याची उत्सुकता लागलेली आहे. तर मंत्रिमंडळावरुन विरोधकांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांच्यावर चांगलाच निशाना साधला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी आजच्या सर्वच प्रशासकीय बैठका, कार्यक्रम रद्द केलत. तर, आज न्यायालयात (Court hearing) सुनावणी होती. पक्ष व चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप याच्या हालचानींना वेग आला आहे.

    दरम्यान, पुढील आठवड्यात किंवा दोन तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं बोललं जात आहे. मागील महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाकोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अशी सुत्रांची माहिती आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादीत भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर (Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan, Ravindra Chavan, Radhakrishna Vikhe Patil, Praveen Darekar, Nitesh Rane, Babanrao Lonikar) यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळं नितेश राणे व प्रवीण दरेकरांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपामध्ये आयारामना मंत्रिपदाची संधी दिली जात आहे, त्यामुळं मूळ भाजपावाले नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाहीय.

    तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर (Shambhuraje Desai, Sanjay Shirsat, Abdul Sattar, Sandipan Bhumre, Gulabrao Patil, Dada Bhuse, Uday Samant, Deepak Kesarkar) यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जाईल अशी सुत्रांची माहिती समोर येत आहे.