हेमंत गोडसेंनी प्रचार सुरु केला, पण महायुतीचा तिढा कायम राहिला; छगन भुजबळ म्हणतात…

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा कायम असतानाही हेमंत गोडसे यांनी प्रचाराचा नारळ फोडत रणशिंग फुंकले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झाल्याचे म्हटले आहे.

    नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा कायम असतानाही हेमंत गोडसे यांनी प्रचाराचा नारळ फोडत रणशिंग फुंकले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत पेच वाढण्याची शक्यता आहे.

    हेंमत गोडसे यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा असतानाच छगन भुजबळ यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर हेमंत गोडसे आता काय भूमिका घेणार याकडे नाशिक आणि राज्याचे लक्ष लागले आहे.

    नाशिक लोकसभा मतदारसंघातून माझ्या उमेदवारीचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांनी अचानक कळवला आहे. मी उमेदवारी मागितली नव्हती आणि उमेदवारी मिळेल याची कल्पनाही नव्हती. शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी आग्रह लावून धरला आहे. मात्र, महायुतीसाठी आम्ही एकत्र काम करू. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली तर घड्याळ चिन्ह राहील, असे छगन भुजबळ म्हणाले.