कुणाल पाटील फाऊंडेशनचा कोणाला पाठिंबा, दोन दिवसात येणार निर्णय

फाऊंडेशन महाविकास आघाडी की महायुतीला पाठिंबा देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

    ठाणे : निवडणूकीत कोणाला पाठिंबा द्यायचा आहे. या संदर्भात कुणाल पाटील फाऊंडेशनच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठया संख्यने नागरीक उपस्थित हाेते. येत्या दोन दिवसात फाऊंडेशन आपला पाठींबा जाहीर करणार आहे. फाऊंडेशन महाविकास आघाडी की महायुतीला पाठिंबा देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

    कल्याण पूर्वेतील आडीवली ढाेकळी या प्रभागाचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या फाऊंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरु असते. कुणाल पाटील फाऊंडेशनच्या वतीने कोविडच्या काळात देखील नागरीकांना मोठ्या प्रमाणात मदत दिली गेली. लोकसभा निवडणूक सुरु आहे. कुणाल पाटील अपक्ष निवडून आले होते. कुणाल पाटील यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याने वेळो वेळी त्यांनी आपला पाठिंबा अनेकांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २० मे ला मतदान होणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे. कुणाल पाटील फाऊंडेशनचे चार ते पाच प्रभागात कामाच्या माध्यमातून चांगले नाव आहे.

    कुणाल पाटील फाऊंडेशनने कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी एक बैठक त्यांच्या कार्यालयात पार पडली. कुणाल पाटील यांच्या आई शोभा दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते. फाऊंडेशनने कोणाला पाठिंबा द्यावा यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली नाही. नागरीकांनी त्यांची मते मांडली. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नागरीकांच्या प्रतिक्रिया विचारात घेतल्या आहेत. येत्या दोन दिवसात कोणाला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती पाटील यांच्या आई शोभा दिनकर पाटील यांनी दिली आहे.