गर्दीची स्पर्धा कोण जिंकणार? शिवसेना की शिंदे गट, उत्सुकता शिगेला

शिवसेना व शिंदे गटामधून दसरा मेळाव्याला गर्दीची स्पर्धा कोण जिंकणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना व शिंदे गट आपपल्या दसरा मेळाव्याला लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे. बसेस, गाड्या आदी वाहनातून राज्यभरातून लोकं मुंबईत येतील असा विश्वास शिवसेना व शिंदे गटांला आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रातील बीकेसी (BKC) येथे होत आहे, शिंदे गटानेही दसरा मेळाव्याचा तिसरा टिझर लॉन्च केला आहे.

    मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार आहे, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही दसरा मेळावे व्यवस्थित पार पडावेत, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

    तर दुसरीकडे शिवसेना व शिंदे गटामधून दसरा मेळाव्याला गर्दीची स्पर्धा कोण जिंकणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना व शिंदे गट आपपल्या दसरा मेळाव्याला लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे. बसेस, गाड्या आदी वाहनातून राज्यभरातून लोकं मुंबईत येतील असा विश्वास शिवसेना व शिंदे गटांला आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रातील बीकेसी (BKC) येथे होत आहे, शिंदे गटानेही दसरा मेळाव्याचा तिसरा टिझर लॉन्च केला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यभरातून अडीच ते ३ लाखापेक्षा जास्त लोक बीकेसीत येतील असा विश्वास मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) व्यक्त केला आहे, तर शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला फक्त रत्नागिरी जिल्ह्यातून 7 ते 8 लाख लोकं येतील असं रत्नागिरीचे आमदार साळवी (MLA Salvi) यांनी म्हटलेय. त्यामुळं दसरा मेळाव्यातील ही गर्दीची स्पर्धा कोण जिंकणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.