
राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणाराय. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
भुमरेंची कन्या विजयी
मुख्यमंत्री शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या प्रेरणा प्रतापसिंह पंडित( भुमरे) या दैठण ( ता. गेवराई, जि. बीड) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलकडून सरपंचपदावर निवडून आल्या आहेत.
बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात विखे गटाचा विजय
संगमनेरमध्ये आज 37 ग्रामपंचायतचा निकाल आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने संगमनेरच्या 14 ग्रामपंचायतवर बाजी मारली असली तरीही महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा विकास मंडळाने तीन जागेवर विजय मीळवला आहे. यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जोर्वे गावात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा विजय झाला तर निंभाळे व मालुंजे गवातही भाजपने विजय मिळवला आहे. यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्या जोर्वे गावात विजयाची पताका खेचुन आणल्याची सगळीकडे चर्चा आहे.
– वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये बारा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल लागले असून यामध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. तब्बल 8 ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित सरपंच निवडून आले असून तीन ठिकाणी फक्त काँग्रेसला विजय मिळवता आला तर एका ठिकाणी अपक्ष निवडून आला. देवळी पुलगाव मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांना मोठा फटका बसल्याचे चित्र दिसून आले.
- देवळी – भारतीय जनता पक्ष 8, काँग्रेस 3, अपक्ष 1
आमदार बच्चू कडू यांच्या बेलोरा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट
-बच्चू कडू यांचे बंधू भैय्यासाहेब कडू हे सरपंच पदासाठी 150 मतांनी आघाडीवर
– सदस्य पदासाठी 13 पैकी 5 बिनविरोध. पाचही बच्चू कडू यांच्या पॅनलचे होते उमेदवार तर 2 सदस्य विजयी
-एकूण 13 पैकी 7 सदस्य विजयी
कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपची सरशी…
– कर्जतमध्ये आठपैकी सहा ग्रामपंचायती भाजपकडे…
– जामखेडमध्ये तीन पैकी दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे एक ग्रामपंचायत भाजपकडे
अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा निकाल
-बिनवरोध ग्रामपंचायत एकूण – 5
– काँग्रेस – 34
– भाजप – 9
– शिवसेना – 3
– प्रहार – 7
-वंचित – 1
-युवा स्वाभिमान – 4
-शिंदे गट – 1
-राष्ट्रवादी – 3
-मनसे – 0
-इतर – 10
- धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे यांचा विजय
ग्राम पंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी…अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 20, 2022
इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंचपदी, संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवला विजय
– शशिकला शिवाजी पवार यांचा सरपंच पदावर विजय
– अपक्ष उमेदवारी करत उतरल्या होत्या निवडणूक रिंगणात
– भाजप पुरस्कृत पॅनल
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीनं गड राखला, 16 पैकी 13 ग्रामपंचायतीवर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच वर्चस्व
– ठाकरे गटाला 2 ग्रामपंचायती तर शिंदे गटाला केवळ 1 जागा
-आढळराव पाटलांनी गावं राखलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाचा धुव्वा !
शिरपूर तालुक्यातील १७ पैकी १७ जागा भाजपच्या ताब्यात
भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरीश पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्यातील १७ पैकी १७ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत,
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच
1)शिरगाव-सरपंच -राष्ट्रवादी काँग्रेस (बिनविरोध)
2)कुनेनामा-सरपंच-सुरेखा संदीप उंबरे,भाजप
3)देवले-सरपंच-वंदना बाळू आंबेकर,राष्ट्रवादी काँग्रेस
4)इंदोरी-सरपंच-शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस
5)वरसोली-सरपंच-संजय खाडेभराड,राष्ट्रवादी काँग्रेस
6)निगडे-सरपंच-भिकाजी भागवत-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
7)सावळा-सरपंच-मंगला नागु ढोंगे, राष्ट्रवादी काँग्रेस
8)गोडुंब्रे-सरपंच-निशा गणेश सावंत,भाजप
9)भोयरे-सरपंच-वर्षा बोरकर,भाजप
हिंगोली जिल्हा
एकुण ग्रामपंचायत- 62
ठाकरे गट – 05
शिंदे गट – 09
भाजप- 02
राष्ट्रवादी- 04
काँग्रेस- 01
इतर-02
एकूण 62/23
————–
- औरंगाबादेत ठाकरे गटाला धक्का, शिंदे गट आणि भाजपाचं वर्चस्व
औरंगाबाद जिल्हा
ठाकरे गट 18
शिंदे गट 32
भाजप 30
काँग्रेस 7
राष्ट्रवादी 10
इतर 16
216/ 113
216 पैकी 113 निकाल आलेत
- गोपीचंद पडळकरांची आई हिराबाई पडळकर यांची पडळकरवाडीच्या सरपंचपदी निवड
- ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट – जामनेरमध्ये दगडफेक, भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू