शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद, हा वाद नाहीतर संसदीय कार्यपद्धीतीची थट्टा, काय म्हणाले सिब्बल

आज पुन्हा या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

    नवी दिल्ली – एकनाथ शिंदे यांचा गट हा राजकीय पक्षच नसल्याचा दावा, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढं केला आहे. राजकीय पक्षाबाबत कोणत्याही अटींची पूर्तता शिंदे गटाकडून करण्यात आलेली नाही, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या घटनेला घेण्यात आलेला आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे. ठाकरे गट हीच खरी शिवसेना असल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय. राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटानं काही कागदपत्रं सादर केली आहेत का , अशी विचारणाही करण्यात आली आहे. शिवसेनेची घटना निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटानं सादर केलेली सर्व कागदपत्रंच योग्य असल्याचा दावा सिब्बल यांनी केलाय.

    राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या

    शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रतिनिधी सभेला परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रतिनिधी सभा झाली नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आलीय. अन्यथा निवडणुका घेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आलीय. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदवात दिल्यास पक्षप्रमुखांची मुदतही आपोआप वाढेल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवत असते आणि ठाकरे गटासोबत शिवसेनेची प्रतिनिधी सभा असल्याचं सांगण्यात आलंय. पक्ष सोडून गेलेल्यांनी त्यांची भूमिकाच कधी मांडलेली नाही. तसचं ते आता प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकू नाहीत, असा युक्तिवादही करण्यात आलाय.

    हा वाद संसदीय कार्यपद्धीतीची थट्टा

    निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेची सर्व प्रक्रिया असल्याचं सांगण्यात आलंय. शिंदे गटानं सादर केलेली प्रतिज्ञापत्रे ही अपुरी असल्याचा दावा करण्यात आलाय. २८ जिल्हाप्रमुखांनी शिंदेंना पाठिंब्याची पत्र दिलेलीच नाहीत असाही दावा कपिल सिब्बल यांनी केलाय. शिंदे गटाच्या याचिकेत खोट्या बाबी सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. शिंदे गटाची कार्यपद्धती ही संसदीय कार्याची खिल्ली उडवणारी असल्याचं मतहीशिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद, हा वाद हीतर संसदीय कार्यपद्धीतीची थट्टा, निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मिळवण्यासाठी सुरु असलेल्या सुनावणीत सिब्बल यांनी युक्तीवाद केला.