Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे पक्षचिन्ह कुणाचं? यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाने आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे पक्षचिन्ह कुणाचं? यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाने आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत. शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत. तर अजित पवार गटातर्फे पार्थ पवार निवडणूक आयोगात उपस्थित आहेत.

    अजित पवार गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार गटाच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना हा दावा केला आहे.

    आयोगाकडून शरद पवार गटाची कानउघाडणी
    केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांची कानउघडणी केली. ज्या मुद्द्यांवर गेल्या सुनावणीत आपण युक्तिवाद केला होता त्याचं प्रतिज्ञापत्राच्या मुद्द्यांचा आपण पुन्हा उल्लेख करु नका असं निवडणूक आयोगाने सांगितलं. तेच तेच मुद्दे घेतल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली.