शिवसेना कुणाची? शिवसेना पक्षचिन्ह वाद, निवडणूक आयेगासमोर आज सुनावणी; अंतिम निर्णय होणार? सर्वाचे लक्ष…

शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष व चिन्हावर आपला दावा केला आहे, त्यामुळं हा वाद कोर्टात व निवडणूक आयोगाच्या कचाट्यात आहे. शिवसेनेचं (Shivsena) भवितव्य (२० जानेवारीला) आज ठरणार आहे. शिवसेना कुणाची याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग (Election commission) आज देणार आहे.

    मुंबई– राज्यात उद्धव ठाकरे (Thackery Group) आणि शिंदे गट (Shinde Group) आमने-सामने असून सुप्रीम कोर्टाकडून निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष व चिन्हावर आपला दावा केला आहे, त्यामुळं हा वाद कोर्टात व निवडणूक आयोगाच्या कचाट्यात आहे. शिवसेनेचं (Shivsena) भवितव्य (२० जानेवारीला) आज ठरणार आहे. शिवसेना कुणाची याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग (Election commission) आज देणार आहे, त्यामुळं या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एवढंच नव्हे तर निवडणूक आयोग शिंदे गटाला (Eknath Shinde Group) कौल देण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

    याचिकेच्या देखभालीबाबत निर्णय घेणार…

    दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विचार होण्याची शक्यता आहे. तसेच अंतिम आदेश देताना निवडणूक आयोग एकनाथ शिंदे यांच्या याचिकेच्या देखभालीबाबत निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही कायद्याच्या विरोधात काही केलं नसल्याचं घटनातज्ज्ञांनी सांगितल्याची माहिती दिली. आम्ही कोणताही निर्णय कायद्याच्या विरोधात जाऊन घेतलेला नाही. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल आम्हाला विश्वास होता, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    तर दिलासा मिळण्याची शक्यता

    चिन्हाबाबत शिंदे गटाला निवडणूक आयोग दिलासा देण्याची शक्यता आहे. पक्ष आणि चिन्ह हा वाद सुरु असताना, दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव, शिंदे गट आणि शिवसेनेने बदलेला विधानसभेतील गटनेता, मुख्य प्रतोद आदी मुद्दय़ांवर दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या सहा याचिकांवर सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी आता १४ फेब्रुवारीला होणार  आहे. आपण शिवसेना सोडली नसल्याचा शिंदे गटाचा दावा असून ४० आमदारांना १५ आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे. त्यानंत आज २० जानेवारीला पक्ष व चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.