गुलाल कुणाचा? विधान परिषद शिक्षक व पदवीधर निवडणुकीचा निकाल आज, कुणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ; ‘या’ शक्यतांना उधाण…

विजयाची (WIN) माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, खासकरुन नाशिक व नागपूरमध्ये काय होते, याची उत्सुकता लागली आहे. कारण या ठिकाणी उमेदवार देण्यावरुन बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

    मुंबई- विधान परिषदेच्या शिक्षण व पदवीधर निवडणूकीचा (MLC Election) निकाल (Result) आज लागणार आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे गुरुवारी आज निकाल जाहीर केले जातील. त्यामुळं कोण विजयी होणार, विजयाची (WIN) माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, खासकरुन नाशिक व नागपूरमध्ये काय होते, याची उत्सुकता लागली आहे. कारण या ठिकाणी उमेदवार देण्यावरुन बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

    यांचे आज काय होणार?

    नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागोराव गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे. त्यामुळं कोण जिंकणार व कोण हरणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.

    नाशिकमध्ये रंगले नाट्य…

    कॉंग्रेसने नाशिक (Congress Nashik) पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली होती. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi patil) यांनी उध्दव ठाकरे (Udhav thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधला होता. तसेच या ठिकाणी काँग्रेसनं सुधीर तांबे व सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळं या ठिकाणी कोण जिंकते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.