मुश्रीफांवरच का कारवाई? काय आहे कोल्हापुरात हसन मुश्रीफांचं राजकीय महत्त्व? शिवसेनेच्या नेत्यांनंतर आता भाजपाचं टार्गेट राष्ट्रवादी; फटाके कुणाच्यामागे…

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व आमदार हसन मुश्रीफ हे पक्षातील मोठे व पहिल्या फळीतील नेते आहेत, मुश्रीफ हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. आपल्या प्रभावी कामांमुळं कागल या मतदारसंघात मागील पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

    कोल्हापूर- आज राज्याच्या राजकीय क्षेत्रातून सकाळी एक मोठी घडामोड व महत्त्वाची बातमी समोर आलीय. माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडी (ED) आणि आयकर विभागाने (Income Tax) धाडी टाकली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल (kolhapur, kagal) येथील घरांवर पहाटे 6.30 वाजल्यापासून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीत जवळपास 20 अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आज दिवसभर आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभाग छापेमारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या छापेमारीनंतर आमदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, मी माहिती घेऊन बोलतो, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

    कार्यकर्त्यांची संतप्त भावना, पोलीस-कार्यकर्त्यांमध्य बाचाबाची…

    आज आपल्या नेत्याच्या घरी आयकर विभाग व ईडीने छापेमारी करत असल्याची माहिती मिळताच, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना असून, आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली असून, पोलीस व कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आहे. मुश्रीफ यांच्या घरी जाण्यासाठी कार्यकर्ते ठाम जसे कार्यकर्त्यांना समजत आहे, तशी मोठी गर्दी होत आहे. कारण मुश्रीफांना देव मानणारा त्यांचा मतदार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी गर्दी झाली असून, आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे. कारण मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील त्यांना मानणारा एक मोठा गट तसेच त्यांचा चाहता वर्ग आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी पडल्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, कार्यकर्त आक्रमक झाले आहेत. तसेच ह कार्यकर्ते आयकर विभाग व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे.

    काय आहे कोल्हापुरात मुश्रीफांचं राजकीय महत्त्व?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व आमदार हसन मुश्रीफ हे पक्षातील मोठे व पहिल्या फळीतील नेते आहेत, मुश्रीफ हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. आपल्या प्रभावी कामांमुळं कागल या मतदारसंघात मागील पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील ओबीसी समाजाचा मोठा चेहरा तसेच मुस्लीम समाजातील विश्वासू चेहरा म्हणून मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळं कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. आपल्या कामांमुळं मतदारांची विश्वासार्हता व मने दोन्ही त्यांनी जिंकली आहे. कागल या मतदारसंघात मुश्रीफ यांना देव मानले जाते. कारण मुश्रीफ यांनी तळागळातील लोकांची कामे केली आहेत. 2014 साली जेव्हा मोदी लाट होती, तेव्हा सुद्धा मुश्रीफ कागल मतदारसंघात जिंकून आले होते. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांचे विशेष राजकीय महत्व असल्याचं बोललं जातंय.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हा आमदार हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ आहे. कोल्हापुरातील आप्पासाहेब नलावडे, गडहिग्लज साखर कारखान्यात १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हा कारखाना आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई अनधिकृतपणे चालवत होते. या कारखान्यात आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई व स्वत: मुश्रीफ यांनी मिळून १२७ कोटींचा घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच याआधी देखील याची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमय्यांनी केली होती. त्यानंतर आज आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज या ठिकाणी सध्या ईडी छापेमारी करत आहे.