
ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थांच्या व्यवहाराचे रॅकेट उघड होऊन ११ दिवस लोटले तरी राज्य सरकार ढिम्मच आहे, बोलघेवडे भाजप नेते चुपचाप (BJP Leaders) बसले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केला.
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थांच्या व्यवहाराचे रॅकेट उघड होऊन ११ दिवस लोटले तरी राज्य सरकार ढिम्मच आहे, बोलघेवडे भाजप नेते चुपचाप (BJP Leaders) बसले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केला. या प्रकरणात राज्य सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय का? असा सवालही त्यांनी केला आहे.
सामान्य लोकांसाठी आधार असलेले ससून सर्वोपचार रुग्णालय अमली पदार्थांच्या तस्करीचा अड्डा बनले, ही बाब पुणेकरांना धक्का देणारी आहे. वास्तविक, पाहता हे प्रकरण उघडकीस येताच राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कठोर कारवाया करायला हव्या होत्या. ते अजूनही ढिम्मच आहे.
एवढा शरमेचा प्रकार घडलेला असतानाही एरवी कोणत्याही प्रश्नावर वायफळ बडबड करणारे भाजपचे बोलघेवडे नेते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांचे मौनही संतापजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.