विश्वनाथ भोईर हे खरे लोकप्रतिनिधी त्यांचे अभिनंदन असे का म्हणाले मनसे आमदार राजू पाटील?

    कल्याण : एव्हढे अधिकारी असून देखील शहरातील रस्ते, स्वच्छता, खड्डे, गर्दी या समस्या का सूटत नाही. जेव्हा माझ्या सहनशक्तीतेच्या पलिकडे होईल. मग त्यावेळ मला काय करायचे ते मी करणार असे विधान शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अशी खंत व्यक्त करीत प्रशासनाचा नाकर्तेपणा अधोरेखीत केला आहे. आमदार भोईर यांच्या विधानानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जे खरे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी असे स्पष्टच बाेलले पाहिजे. त्यांच्या सारखे लोकप्रतिनिधी सत्तेत असून देखील बोलतात असे बोलत आमदारांच्या वक्तव्याला सहमती दर्शविली आहे.

    कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध समस्या बाबत केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणची घेटे सोबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार भोईर यांनी आज बैठक घेतली. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जे काय करावे लागेल ते करा असे अधिकाऱ्यांना बजावले. आमदारांनी दुर्गाडी ते पत्रीपूलाच्या दरम्यान रस्त्यावरील खड्डे भरण्याची सूचना केली. हे रस्ते कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येतात. ते न पाहता महापालिकेने खड्डे बुजविले पाहिजेत. वारंवार आयुक्तांना सांगून देखील कामे का होत नाहीत असा प्रश्न विचारला असता. आमदार भोईर यांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली. आमदार भोईर यांनी सांगितले की, याच्या मध्ये कुठे तरी आढळून येते की, प्रतिनियुक्तीवर बरेच अधिकारी आलेले आहे. स्टाफ सर्व भरलेला आहे. तरी देखील कामे होताना दिसून येत नाही. कल्याणच्या पब्लीकला कोडे पडले आहे. तसेच मलाही कोडे पडले आहे. हे कोडे आपल्याला तोडायचे आहे. एव्हढे अधिकारी असताना कल्याणमध्ये कुठे तरी बकालपणा सुरु आहे. रस्ते, स्वच्छता या सोयी सुविधा लोकांना का देऊ शकत नाही. याची कोडं मला फोडायची आहे. ज्या वेळेस माझ्यापण सहनशक्तीच्या पलिकडे होईल त्यावेळी मी काय करायचे आहे ते करणार

    या बाबत आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. एका बाबतीत मी त्याचे अभिनंदन करेन. सत्तेधारी पक्षात असाता देखील त्यांनी ही व्यथा मांडली. जे खरे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी असे स्पष्टच बोलायला पाहिजे. वरवरची विकास कामे तुम्हाला दिसतात. ती लाेकांपर्यंत पोहचलेली नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे. चांगली काय आहे या शहरात तुम्ही दाखवा. खड्डे, रस्ते,ट्राफिकचा बोजवारा, भ्रष्टाचार चांग्लया गोष्टी आहेत कुठे जोपर्यंत ही लोक ठाण मांडून बसली आहेत. तोपर्यंत हे असे चालणार.