Best's fleet will include state-of-the-art double decker buses; Sophisticated facilities with two doors, two stairs, CCTV cameras

मुंबई पालिका स्थायी समिती अध्यक्षांनी ३९ रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर करताना दादर, परळ या विभागाचा सी-२७४ हा प्रस्ताव कोणत्या कारणांसाठी मागे ठेवला.तर त्यांनी २७ कोटींचा प्रस्ताव विचारात का घेतला नाही? असा सवाल भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अध्यक्षांना केला आहे( Why didn't the chairman of the standing committee ask for a proposal of Rs 27 crore? BJP questions the ruling party ).

    मुंबई : मुंबई पालिका स्थायी समिती अध्यक्षांनी ३९ रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर करताना दादर, परळ या विभागाचा सी-२७४ हा प्रस्ताव कोणत्या कारणांसाठी मागे ठेवला.तर त्यांनी २७ कोटींचा प्रस्ताव विचारात का घेतला नाही? असा सवाल भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अध्यक्षांना केला आहे( Why didn’t the chairman of the standing committee ask for a proposal of Rs 27 crore? BJP questions the ruling party ).

    जी दक्षिण विभागात शिवसेनेचे युवा नेते नेतृत्व करत असताना इतर सर्व प्रस्ताव मंजूर होत असताना हा प्रस्ताव नेमका मागे का ठेवला गेला? याबाबत संशयाचे धुके स्थायी समिती अध्यक्षांच्या भोवती दाटले आहे. त्यांनी याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे असे परखड मत गटनेते शिंदे यांनी व्यक्त केले. स्थायी समितीत रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांना या विभागाचे सोयरसुतक नाही काय? असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

    भाजपाच्या नगरसेवकांनी रस्त्यांचे विषय ‘नॉट टेकन’करण्याची मागणी केल्यानेतर शिवसेनेची बदनामी होते असा कांगावा करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आता हा विषय ‘नॉट टेकन’ झाल्यावर स्थायी समिती अध्यक्षांनी शिवसेनेची बदनामी केली का? याचे उत्तर द्यावे. तसेच या प्रस्तावाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे स्थायी समिती अध्यक्षांनी मुंबईकरांना दिली पाहिजेत असे प्रतिपादन गटनेते शिंदे यांनी केले.